संरक्षण मंत्रालयाने आयोजित केलेल्या स्पर्धेत १० रोख पुरस्कारासह २५ हजार जिंकण्याची संधी, जाणून घ्या नियम व अटी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सरंक्षण मंत्रालयाने कारगिल युद्धाला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त MyGov.in च्या साहाय्याने एका ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित केली आहे. या प्रश्नमंजुषेच्या माध्यमातून तरुण आणि देशाच्या नागरिकांच्या मनात राष्ट्रभक्ती आयोजित करणे हा आहे. या प्रश्नमंजुषेचा कालावधी हा २६ जुलै ते ४ ऑगस्ट पर्यंत आहे. MyGov.in या वेबसाईटवर हि प्रश्नमंजुषा आयोजित केली असून हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये हि आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा खेळण्याचा कालावधी हा ५ मिनिटांचा असून यामध्ये २० प्रश्न विचारण्यात येणार आहे.

या स्पर्धेत १० रोख रकमेचे पुरस्कार मिळणार आहेत

१) पहिला पुरस्कार- रोख २५ हजार रुपये
२) दुसरा पुरस्कार- रोख १५ हजार रुपये
३) तिसरा पुरस्कार- १० हजार रुपये
४) उत्तेजनार्थ पुरस्कार सात- प्रत्येकी ५ हजार रुपये रोख

पहिल्या १०० विजेत्यांना संरक्षण मंत्रालयाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. त्याचबरोबर त्यांना १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावर आयोजित करण्यात येणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात येणार आहे.

नियम व अटी
१)
१४ वर्षांच्या वरील कोणताही भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
२) कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त उत्तरे देणाऱ्या स्पर्धकाला विजयी घोषित केले जाईल.
३) एक व्यक्ती एकाच वेळी या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
४) मोबाईल नंबर आणि ईमेल नंबरचा वापर स्पर्धक पुन्हा करू शकत नाही.

आरोग्यविषयक वृत्त