१० वी पास असणार्‍यांसाठी ‘सरकारी’ नोकरीची ‘सुवर्णसंधी’ ; भारतीय टपाल विभागात १७३५ जागांसाठी भरती, जाणून घ्या प्रक्रिया

नवी दिल्ली : पोलीसनामा ऑनलाइन – सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. भारतीय टपाल विभागाने १० वी पास विद्यार्थ्यांसाठी १७३५ ग्रामीण टपाल सेवक (GDS) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या जागा भारतीय टपाल दिल्ली, हिमाचल प्रदेश आणि झारखंड विभागासाठी आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ जुलै आहे.

असा करा अर्ज –

भारतीय टपाल विभागाच्या https://www.appost.in/gdsonline या अधिकृत वेबसाईटवरून तुम्ही अर्ज करु शकता. १२ जुलै २०१९ ही अर्ज नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे. तर ऑनलाईन अर्ज १३ जून पासून १९ जुलैपर्यंत स्विकारण्यात येणार आहेत.

जागांचे वर्गिकरण आणि वेतन –

दिल्ली – ११७ 
हिमाचल प्रदेश – ७५७
झारखंड – ८०४
वेतन – १०,००० प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठी जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस, या वर्गातील उमेदवारांना १०० रुपये अर्ज फी आहे. तर या व्यतिरीक्त अन्य वर्गातील उमेदवारांना तसेच महिला उमेदवारांना अर्ज फी नाही. अर्ज फी ऑनलाईन पद्धतीने जमा करता येऊ शकते. तसेच कोणत्याही टपाल विभागात देखील अर्ज फी जमा करता येऊ शकते. मुख्य टपाल विभागाची माहिती https://appost.in/gdsonline या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

वयोमर्यादा –

या पदासाठी उमेदवाराचे वय १८ वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असले पाहिजे. एससी/एसटी वर्गातील उमेदवारांना ५ टक्के सुट देण्यात आली आहे. तर ओबीसी वर्गातील उमेदवारांना ३ वर्षांची सुट देण्यात आली आहे.

शैक्षणिक मर्यादा –

ग्रामीण टपाल सेवक पदासाठी अर्ज करणारा उमेदवार इयत्ता १० वी मध्ये गणित आणि इंग्रजी विषयात पास असणे गरजेचे आहे. प्रथम श्रेणी मध्ये पास असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्राधान्य देण्यात येणार आहे. तसेच परिसरातील भाषाचे ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराजवळ ६० दिवस संगणक प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

साजूक तुपामुळे होतात ‘हे’ ५ फायदे

अवेळी मासिक पाळी येण्याची ‘ही’ ४ प्रमुख कारणं, ‘ही’ काळजी घ्या

चिडचिडेपणा ‘या’ ५ गोष्टींमुळं वाढतो, जाणून घ्या

दिवसा ‘अवेळी’ झोप येत असेल तर ‘हे’ 4 उपाय करा, जाणून घ्या

झोप न येण्या मागं ‘ही’ कारणं, ‘ही’ काळजी घ्या

डोकेदुखीला ‘या’ घरगुती उपायांनी करा ‘बाय-बाय’

गॅस सिलेंडर लीक होत असल्यास ‘सुरक्षेसाठी’ करा हे उपाय