खुशखबर ! आता कधीपण ‘बिनधास्त’ रेल्वे तिकीट काढा, रेल्वे मंत्रालयाकडून ‘अ‍ॅप’ सुरू, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – रेल्वेने आपल्या ग्राहकांना आता आणि एक महत्वपूर्ण आणि अत्यंत उपयोगाची सेवा उपलब्ध करुन दिली आहे. आता तुम्ही पेपरलेस आणि पेपरमोड अशा दोन्ही प्रकार तुमचे तिकिट बुक करु शकणार आहेत. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी UTS (Unerserved Ticketing System App) ची सेवा संपूर्ण देश भरात लॉन्च केली आहे. UTS अ‍ॅपच्या माध्यमातून संपूर्ण देशात कधीही स्टेशनच्या ५ किलोमीटर अंतरादरम्यान आपल्या मोबाईलच्या माध्यमातून जनरल तिकिट, प्लेटफार्म तिकिट पर्यंत सर्व तिकिट बुक करु शकतात. असे अ‍ॅप सुरू झाल्याने तिकिट खिडकीवर होणारी गर्दी आणि लागणारी रांग कमी होईल आणि तिकिट देखील लगेचच उपलब्ध होईल.

असे वापरा UTS

१. यासाठी सर्वात आधी आपल्या मोबाईलवर प्लेस्टोर मधून UTS on mobile डाऊनलोड करा.
२. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबरची त्यावर नोंदणी करा.
३. आता स्टेशनचे नाव टाका जेथून तुम्ही प्रवास करु इच्छिता, आणि उतरण्याचे ठिकाण टाका.
४. त्यानंतर तुम्हाला तिकिटाची किंमत येईल.
५. त्यानंतर शुल्क भरण्याचा पर्याय येईल.
६. हे शुल्क तुम्ही ऑनलाइन भरु शकतात. तसेच रेल्वे वॉलेटमधून शुल्क भरु शकतात.

पेपरलेस आणि पेपर मोडमध्ये काढा तिकिट
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार यातून तुम्ही पेपर लेस आणि पेपरमोड दोन्ही प्रकारे तिकिट बुक करु शकतात. पेपरलेस तिकिट तुम्ही बुक केले तर अ‍ॅपच्या माध्यमातून लोकेशन चेक करण्यात येईल. जर तुम्ही रेल्वेत नसाल किंवा रेल्वे परिसरात नसाल तर तुमचे तिकिट बुक होईल. यानंतर तुम्ही कोणत्याही हार्डकॉपीशिवाय रेल्वे स्टेशनवर जाऊ शकतात. या माध्यमातून तिकिटाचे डिटेल्स तुम्हाला तुमच्या फोन वर देखील मिळतील.

आरोग्यविषयक वृत्त