‘इन्कम टॅक्स’ भरताना चुकूनही ‘या’ गोष्टी करू नका, घ्या जाणून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – आता सध्या २०१८-२०१९ वर्ष संपत आल्याने इनकम टॅक्स भरण्याची वेळ आली आहे. आता ITR चे काही नियम बदल गेले आहेत आणि फॉर्म मध्येही बदल करण्यात आले आहे. अशा वेळेस कधी कधी कळत तर कधी नकळत आपल्या कडून चुका या होत असतात. जर तुम्ही जाणून बुजून चुका करत असाल तर सतर्क राहा. कारण आता ITR विभाग ऑटोमेटेड सॉफ्टवेयर पासून चालतात आणि अर्टिफिशियल इंटेलिजेंसचा हि प्रयोग केला जात आहे. अशा लहान लहान चुकांपासुन कसे सावध राहावे याची माहिती पुढे दिली आहे :

– बचत खात्याद्वारे मिळणाऱ्या व्याज आपल्या ITR मध्ये नक्की दाखवा.

– मागील कंपनीच्या पगाराच्या उत्पन्नाची माहिती भरा.

– फॉर्म २६ AS डाउनलोड करून आपल्या उत्पन्नाशी जोडणे गरजेचे आहे.

– फॉर्म २६ AS जर जोडले गेले नाही तर त्या कडे दुर्लक्ष करू नका.

– भांडवलीचा नफा व तोटा लपवू नका.

– स्वतः हा शी निगडित चुकीची माहिती देऊ नका.

अगदी साध्या वाटणाऱ्या पण महत्त्वाच्या या चुका जर आपण केल्या तर याची भरपाई पण आपल्यालाच करावी लागते.  म्हणून ITR भरताना सतर्क रहा आणि बदलेल्या नियमांची माहिती घेऊन चुका दूर करण्याचं प्रयत्न करा. दरवर्षी अनेक लोक अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करतात आणि शेवटी त्यांना याचा खूप मोठा फटका बसतो.

 

सकाळी लवकर उठणाऱ्या महिलांना ब्रेस्ट कॅन्सरचा धोका कमी ?

ब्रश केल्यानंतरही तोंडाची दुर्गंधी येते का ? ही असू शकतात कारणे

आश्चर्यच ! आता पोटातील गॅस बाहेर पडताच दुर्गंधी ऐवजी दरवळेल सुगंध

पारधी समाजाच्या महिलेचा विनयभंग करून मिरच्या चोरीच्या आरोपावरून मारहाण

जाती-धर्मामुळे मानवतावादी दृष्टिकोनाला तिलांजली दिली जातेय – डॉ. गणेश देवी