खूशखबर ! आता ‘घरकाम’ करणाऱ्यांची होणार ‘नोंदणी’, मिळणार ‘किमान’ वेतन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – घर काम करणाऱ्या घरेलू कामगारांसाठी किमान वेतन सहित अन्य अनेक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरकार एक राष्ट्रीय धोरण तयार करण्यात येत आहे. श्रम सुधारणात वाढ करण्यासाठी ही धोरण तयार करण्यात येत आहे. हेच धोरण कामगार मंत्रालय सध्या तयार करत आहे. यामुळे घरेलू कामगार संघटित होऊन आपल्या समस्या मांडू शकतील.

घरेलू कामगार होणार संघटित
कामगार मंत्रालयानुसार, श्रम सुधारणा अंतर्गत पहिल्यांदाच घरेलू कामगारांसाठी एक राष्ट्रीय धोरण तयार करण्यात येत आहे. यात घरेलू कामगारांना नोंदणी करण्याचा अधिकार मिळेल. याशिवाय घरेलू कामगारांना संघ आणि ट्रेड युनियन स्थापित करण्याचा अधिकार मिळेल. आता पर्यंत या घरेलू कामगारांसाठी कोणत्याही प्रकारची संघटना नाही.

त्यामुळे हे धोरण राबवल्यास या असंघटित क्षेत्रातील कामगार संघटित होऊ शकतील आणि आपल्या मागण्या मांडू शकतील. यामुळे या घरेलू कामगारावर होणारे अन्याय आणि समस्या ते एकत्रित पणे सरकार समोर मांडू शकतील. हे धोरण घरेलू कामगारांसाठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.

किमान वेतन दर देखील ठरवणार
घरेलू कामगार असंघटित असल्याने त्यांना किमान वेतनाधारित वेतन ठरवण्यात आले नव्हते. त्यामुळे नाईलजास्तव या कामगारांना कमी दरात काम करावे लागत असे. नव्या कामगार धोरणात त्यांच्यासाठी न्यूनतम मजदूरीची तरतूद करण्यात येणार आहे.

नव्या धोरणात घरेलू कामगारांना सामाजिक सुरक्षा, दुर्व्यवहार, हिंसेपासून संरक्षण यासारखे अधिकार देण्यात येतील. याशिवाय घरेलू कामगारांना विविधत खटला दाखल करणे आणि नोकरी मिळवणे यासाठी प्लेसमेंट एजन्सीचे गठण करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त