घर बसल्या बुक करा ‘ताजमहल’, ‘लाल किल्ला’ आणि इतर ऐतिहासिक स्थळांचे तिकिट !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपल्या सर्वांचेच एक स्वप्न असते की, एकदा तरी ताजमहल, लाल किल्ला बघायाच. आता ते आधिक सोपे झाले आहे. ताजमहल किंवा लाल किल्लांवर जाण्यासाठी लागणारे तिकिट मिळवण्यासाठी आता कुठे ही जायची, किंवा कोणाला विचारण्याची गरज नाही, आता तुम्ही लाल किल्ला आणि ताजमहलचे तिकिट घर बसल्या बुक करु शकणार आहेत.

116 ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश –

भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने मेक माय ट्रिप बरोबर एक करार केला आहे. यामुळे देशातील ११६ ऐतिहासिक स्मारकांना ऑनलाइन बुकिंगची सुविधा दिली आहे. मेकमाय ट्रिप ने सांगितले की, या करारानुसार एएसआयच्या संरक्षणाच्या अंतर्गत ऐतिहासिक स्मारकांसाठी ऑनलाइन बुकिंग गेटवे उपलब्ध करण्यात येईल. या स्मारकात ताजमहल, लालकिल्ला, कुतूब मीनार, हुमायूचा मखबरा, खजुराहो मंदिर, चारमिना, गोवळकोंडा फोर्ट यांच्या समावेश करण्यात आला आहे. या भागीदाराचा हेतू भारतातील पर्यंटनाला प्रोस्ताहन देणे असा आहे.

ई तिकिट बुकिंग सेवा –

मेक माय ट्रिपच्या संस्थापक तसेच समूह मुख्य कार्यकारी अधिकारी दीप कालार यांनी सांगितले की, एएसआयबरोबर भागीदारी केली आहे. यामुुळे प्रवासी सहज या सुविधेचा लाभ घेऊ शकतील आणि बुकिंग करु शकतील. ते म्हणाले की, लोकांना ई तिकिट बुकिंग सेवा उपलब्ध करुन दिली जाईल आणि त्यांना त्यासाठी मोठ्या रांगेत उभे राहावे लागणार नाही.

भारतीय पुरातत्व विभाग आणि मेक माय ट्रिप या खासगी कंपनीने यासाठी एक एमओयू करार केला आहे, त्यानुसार ताजमहल, लाल किल्ला आणि इतर ऐतिहासिक स्थळावर जाऊन रांगेत उभे राहून तिकिट काढण्याच्या कंटाळवाण्यास प्रक्रियेतून पर्यटकांची सुटका होणार आहे. पर्यटन स्थळावर जाण्या आधीच पर्यटक आपले तिकिट बूक करु शकणार आहेत.

समृद्ध आरोग्यासाठी ‘शीर्षासन’

तळपायांना होतात हे आजार, जाणून घ्या

उलट्यांचा त्रासाने प्रवास टाळत असाल तर करा ‘हे’ ४ उपाय

लिंबू पाणी पिण्याचे ‘हे’ ७ फायदे

पेनकिलर ऐवजी ‘हे’ घरगुती उपाय करा, तत्काळ ‘रिलीफ’ मिळेल

पोटदुखीसह त्वचा आणि केसांच्या समस्यांवर ‘हे’ गुणकारी औषध, जाणून घ्या

‘ही’ ४ झाडे विविध आजारांवर उपयोगी, जाणून घ्या

‘हा’ योगा केल्याचे ४ फायदे, वेळोवेळी पाणी पिण्याची नाही गरज

‘हे’ उपाय केल्याने चेहरा होईल ‘चमकदार’ ; फेशिअलची गरज नाही