iPhone 11 लॉन्च केल्यावर ‘Apple’ ने केले ‘इतर’ मॉडेल 20 हजारांपर्यंत ‘स्वस्त’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरात प्रसिद्ध असलेल्या अ‍ॅपल या फोन निर्माता कंपनीने आयफोन 11 बुधवारी लॉन्च केला. भारतात याची किंमत 64,500 रुपये आहे. परंतू ही सिरिज लॉन्च केल्यानंतर आता कंपनीने आपल्या इतर फोनच्या किंमती कमी केल्या आहेत. आयफोन 7 पासून आयफोन XS च्या किंमतीत 10 ते 30 टक्के सूट दिली आहे. म्हणजेच हे फोन ग्राहकांना तब्बल 20 हजार रुपयांनी स्वस्त मिळतील. त्यामुळे सणासुदीला ग्राहकांना कंपनीकडून हे गिफ्टच आहे.

वनप्लसला टक्कर देण्यासाठी उचलले पाऊल –
अ‍ॅपल भारतीय बाजारातील उत्पादनांची विक्री वाढवू इच्छित आहे. कंपनीला भारतीय बाजारात सॅमसंग आणि वनप्लसचे आव्हान आहे. त्यामुळे कंपनीने आपल्या फोनच्या किंमती कमी केल्या आहेत. त्यामुळे आयफोन 7 S 32 जीबी 10,000 रुपयांनी स्वस्त होऊन 30,000 रुपयांवर आला आहे. 2018 साली अ‍ॅपलची विक्री कमी होऊन 17 लाख यूनिट्सवर आला आहे, तर 2017 साली ती 32 लाख होती.

भारतातील विक्री वाढणार –
भारत कंपनीसाठी मोठा बाजार आहे. त्यामुळे कंपनीने निर्णय घेतला आहे की भारतातील आपले मार्जिन कमी ठेवणे आणि विक्री वाढवणे.

भारतात जास्त विकणार आयफोन –
काऊंटरपाइंटचे रिसर्च डायरेक्टर तरण पाठक यांनी सांगितले की, भारतात अमेरिकी किंमतीवर 28 टक्के प्रीमियम चार्ज कंपनी घेत आहे. तर मागील वर्षी आयफोन XS वर कंपनी 48 टक्के प्रीमियम घेत होती. ते म्हणाले की कंपनी आता सॅमसंग आणि इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी भारतातील विक्री वाढवेल.

मॉडेल                                     जुन्या किंमती                       नव्य किंमती
आयफोन XS 64जीबी             99,900 रुपये                     89,900 रुपये
आयफोन XS 256जीबी           1,14,900 रुपये                   1,03,900 रुपये
आयफोन XR 64जीबी             59,900 रुपये                    49,900 रुपये
आयफोन XR 128जीबी           64,900 रुपये                    54,900 रुपये
आयफोन 8 प्लस 64जीबी       69,900 रुपये                    49,900 रुपये
आयफोन 8 64जीबी               59,900 रुपये                     39,900 रुपये
आयफोन 7 प्लस 32जीबी       49,900 रुपये                     37,900 रुपये
आयफोन 7 प्लस 128जीबी     59,900 रुपये                     42,900 रुपये
आयफोन 7 32जीबी               39,900 रुपये                     29,900 रुपये
आयफोन 7 128जीबी             49,900 रुपये                     34,900 रुपये

 

Loading...
You might also like