आता ज्युस सारखं बिअर प्या ! ‘या’ २ कंपन्या लॉन्च करणार नॉन-अल्कोहोलिक बिअर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तरुण मुलांचे आवडते अल्कोहोल पेय म्हणजे बियर. मात्र भारतात बियरमध्ये जास्त प्रमाणात अल्कोहोल असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचे सेवन करता येत नाही. मात्र आता विदेशी बियर कंपनी ब्रुअर्स- एनहाइजर-बश इनबेव आणि हनीकेन या कंपन्या लवकरच भारतात शून्य टक्के अल्कोहोल असणाऱ्या बियर तयार करणार आहेत. या नॉन अल्कोहोलिक बियरचे स्पर्धा हि कोका-कोला आणि पेप्सिको यांसारख्या सॉफ्टड्रींक बनवणाऱ्या कंपन्यांबरोबर होईल.

फ्लॅगशिप या नवीन ब्रॅण्डच्या नावाने ते हि बियर बाजारपेठेत आणणार आहेत. युनायटेड ब्रेव्हरीज देखील आपल्या बियरमध्ये शून्य अल्कोहोल असणारी बियर लाँच करणार आहे. हनीकेन 0.0 असे नाव त्या बियरला दिले आहे. बडवाइजर 0.0 हि देखील दुसरी बियर लॉन्च करणार आहे.

सामान्यपणे बियरमध्ये १. २ टक्के ते ८ टक्क्यांपर्यंत अल्कोहोल असते. त्याचबरोबर नॉन -अल्कोहोलिक बियरमध्ये ०. ०५ टक्के इतके अल्कोहोल असते. झिरो अल्कोहोल असणाऱ्या बियरचा तुलनेत सामान्य बियरवर जास्त टॅक्स असल्याने विदेशी कंपन्या आपल्या बियर भारतामध्ये विक्रीसाठी उपलब्ध करत नाहीत. काही राज्यांमध्ये तर किमतीच्या ५० टक्के टॅक्स बियरवर लावतात.

दरम्यान, भारतातील अनेक राज्यांत दारूबंदी आहे. गुजरात, बिहार, नागालँड आणि लक्षद्वीप या राज्यांमध्ये दारूबंदी आहे. त्यामुळे झिरो टक्के अल्कोहोल बियर मार्केटमध्ये आणून कंपनी या राज्यांमध्ये देखील आपला व्यवसाय विस्तारू इच्छित आहेत.

आरोग्यविषयक वृत्त – 

दम्याच्या रुग्णांनी घ्यावी ‘ही’ काळजी, अन्यथा वाढू शकतो त्रास

लाल फळे आरोग्याला फायदेशीर, नियमित करा सेवन

ताकाच्या नियमित सेवनाने वाढते रोगप्रतिकारक शक्ति

डोळ्यांवरून समजू शकते; तुमचे आरोग्य कसे आहे