खुशखबर ! २०२२ पर्यंत ‘क्‍लाउड कॉम्प्युटिंग’ क्षेत्रात १० लाख नोकर्‍या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्याच्या काळात क्लाउड कंप्यूटिंग लहान मोठ्या कंपन्यांमध्ये खूप गरजेचे बनत चालले आहे. जगभरात या क्षेत्रामध्ये लाखो रोजगारांची गरज आहे. ग्रेट लर्निंगच्या अहवालानुसार, २०२२ पर्यंत या क्षेत्रामध्ये भारतात १० लाख पेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार आहेत.

ग्रेट लर्निंगच्या अहवालानुसार, सध्याच्या काळात कंपन्यांकडून पारंपरिक टेक्नॉलाॅजीवर करण्यात येणाऱ्या खर्चाच्या तुलनेत क्लाउड टेक्नॉलाॅजीवर चार पट अधिक गुंतवणूक करण्यात येत आहे. २०२० पर्यंत यामध्ये अजून वाढ होऊ शकते. ग्रेट लर्निंग हे काम करणाऱ्या लोकांना शिक्षण देणारे व्यासपीठ आहे. वरिष्ठ क्लाउड तज्ञ, रोजगार देणाऱ्या प्रबंधकांसोबत संवाद आणि उच्च गुणवतेच्या औद्योगिक शोध अहवाल यांच्या मदतीने हा ग्रेट लर्निंग अहवाल तयार करण्यात आला आहे.

देशामध्ये क्लाउड कम्प्युटिंगचा बाजार २.२ अब्ज डॉलर

अहवालानुसार, येणाऱ्या वर्षात सूचना टेक्नॉलाॅजीवर करण्यात येणारा खर्च जवळपास सार्वजनिक किंवा हायब्रीड क्लाउडवर खर्च केला जाईल. सूचना टेक्नॉलॉजीच्या सर्व कामकाजाला क्लाउड कंप्युटिंगच्या कामकाजामध्ये बदलण्यात येईल. देशामध्ये क्लाउड कम्प्युटिंगचा बाजार सध्या २.२ अब्ज डॉलर इतका आहे. २०२० पर्यंत हा बाजार ४ अब्ज डॉलर होण्याची आशा आहे.

देशातील मोठ्या कंपन्यांकडूनही क्लाऊडचा वापर

क्लाउड सेवा सुरक्षित आणि प्रभावी असल्यामुळे मोठ्मोठ्या कंपन्यांकडून या क्लाउड तंत्रज्ञानाला पसंती मिळत आहे. यामुळे आता पारंपरिक डेटा केंद्रावर क्लाउड कंप्युटिंगचा वापर वाढला असून याचा बाजार वाढत चालला आहे. सुरक्षित आणि जलद सेवेमुळे देशातील प्रमुख कंपन्यांकडून या क्लाउड तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

ससून रूग्णालयात ‘कोडा’वर अधुनिक वैद्यकीय व सर्जिकल उपचार उपलब्ध

‘ट्रॉमेटिक ब्रेन इंज्युरी’मुळे रूग्ण जाऊ शकतो ‘कोमात’ , ही आहेत लक्षणे

रोज एक कप ‘कॉफी’ प्या आणि ‘मधुमेह’ कंट्रोलमध्ये आणा

मराठा समाज सर्वोच्च लढाईसाठी तयार, विनोद पाटील यांनी दाखल केले ‘कॅव्हेट’