खुशखबर ! ‘BSNL’ ने बाजारात आणला ‘स्टार मेंबरशिप’ प्लॅन, मिळणार सर्व रिचार्जवर ‘डिस्काऊंट’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – BSNL ने आपल्या ग्राहकांसाठी Star Membership प्रोग्राम लॉन्च केला आहे. या प्रोग्राम अंतर्गत ग्राहकांना काही स्पेशल सुविधा देण्यात येणार आहे. ही सेवा प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याअंतर्गत नव्या ग्राहकांना जास्त बेनिफिट्सबरोबर स्वस्त प्रीपेड प्लॅन उपलब्ध करण्यात येईल. यात ग्राहकांना कमी किंमतीत प्रीपेड प्लॅन उपलब्ध करुन देण्यात येईल. स्टार मेंबरशिपचा लाभ तेव्हाच मिळेल जेव्हा ग्राहक ४९८ रुपयांचे रिचार्ज करेल.

याला प्लॅनला कंपनीकडून स्टार ४९८ देखील म्हणण्यात आले आहे. या नव्या प्लॅनमध्ये ग्राहकांना अनलिमिटेड वॉइस कॉल आणि ३० दिवसांसाठी ३० जीबी डेटा देण्यात येईल. BSNL स्टार मेंबरशिप ४९८ रुपये प्रीपेड प्लॅन बरोबर तुम्हाला प्रीपेड प्लॅन बरोबर कनेक्ट होऊ शकतात. ज्यामुळे तुम्हाला भविष्यात रिचार्ज करताना डिस्काऊंट मिळणार आहे.

काय आहे BSNL स्टार मेंबरशिप
या रिचार्जच्या वैधता काळात जर ग्राहकांने इतर कोणतेही रिचार्ज केल्यास ग्राहकांला त्यात डिस्काऊंट मिळेल. म्हणजेच ९७ रुपयांचे रिचार्ज ७६ रुपयांना मिळेल. तर ४४७ रुपयांचे रिचार्ज ४०७ रुपयांना मिळेल. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड लोकल STD कॉलिंगबरोबर ३० जीबी डाटा आणि ३० दिवस १००० SMS मिळतील. या प्लॅनची वैधता १ वर्षांपर्यंत असेल.

भारती एअरटेलला टक्कर देण्यासाठी BSNL ने स्टार मेंबरशिप आणली आहे. सध्या हा प्लॅन आंध्र प्रदेश आणि तेलंगणा मध्ये उपलब्ध करण्यात येणार आहे. नंतर हा प्लॅन संपूर्ण देशात लागू करण्यात येणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त –