‘सिमकार्ड’ पेक्षा ‘सोप्प’ असेल इंटरनेटचे ‘ब्रॉडबँड’ कनेक्शन विकत घेणं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सिमकार्ड घेणं आता जेवढं सोपं झालंय तेवढंच सोप्प असणार आहे इंटरनेटचं ‘ब्रॉडबँड’ कनेक्शन घेणं. कारण यासाठी आता सरकार मोठे पाऊल उचणार आहे. माहिती प्रसारण आणि दूरसंचार मंत्री रविशंकर प्रसाद यांनी सामान्य लोकांना सहज इंटरनेट ब्रॉडबँड उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करणार आहेत.

त्यांनी सांगितले की, भारताला इलेक्ट्रॉनिक वस्तूचे निर्यात केंद्र बनवण्यासाठी सरकार सक्रियपणे काम करत आहे. ‘डिजिटल भारत 2.0’ या महत्वकांक्षी लक्ष्याचा उल्लेख करताना म्हणाले की, नॉसकॉमला आणि महिती प्रसारण कंपन्याला देशात डिजिटल गाव आणि डिजिटल साक्षरतेला जोडण्यासाठी सरकारच्या अभियानात मदत करण्याचे आवाहन केले आहे.

हे आहेत डिजिटल इंडियाचे महत्वाचे घटक –

रविशंकर प्रसाद यांनी सांगितले की, ब्रॉडबँड तुमच्या पर्यंत पोहचवणे ही प्राथमिकता आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्ही उद्योजकांना जोडण्याचे काम करत आहोत. जसे की आज पानाच्या दुकानावर देखील सिमकार्ड उपलब्ध आहे. ब्रॉडबँड आणि मोबाईलची सुविधा डिजिटल इंडियाचा महत्वाचा घटक आहे. जे देशातील डिजिटल विकासासाठी मदत करेल.

ते पुढे म्हणाले, देशला इलेक्ट्रिक उपकरण निर्यात करण्यात अधिक संपन्न बनवण्यासाठी देशातील विविध प्रतिभेचा वापर केला जाईल. हे ही पाहणे महत्वाचे ठरेल की डिजिटल इंडिया अंतर्गत 5-जी बरोबरच आर्टिफिशियल इंटेलीजेंस सारख्या नव्या प्रसारणाचा वापर कशा प्रकारे करता येईल. असे रविशंकर प्रसाद म्हणाले.

‘जलयुक्त शिवार’ योजनेच्या कामात भ्र्ष्टाचार ,सभापतींचे चौकशीचे आदेश

बुद्धविहार तसेच उर्वरित रहिवाशांचे त्याच ठिकाणी पुनर्वसन करणार

विना परवाना शेकडो खड्डे खोदल्याने नगर परिषदेचा समोर आला गलथान कारभार

दिवसभर थकणाऱ्या हातांनादेखील रिलॅक्स करणे गरजेचे

हिंमत असेल तर आगामी विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी’

पोट आणि कंबर अधिक आकर्षक करण्यासाठी करा’स्ट्रेचिंग’

शरीराला पाण्याची गरज का असते ? जाणून घ्या ही ५ कारणे