खुशखबर ! किराणा दुकानात ‘हा’ बिझनेस सुरू करण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी, महिन्याला ‘कमवा’ हजारो रूपये

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – किराणा दुकानांसाठी आता कमाई करण्याची संधी मिळणार आहे. किराणा स्टोर इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी स्वॅपिंग स्टेशन म्हणून काम करु शकतात. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन देण्यासाठी सरकार यावर काम करत आहे. या कामासाठी किराणा मालाच्या दुकानांसाठी लायसेंस घेण्याची आवश्यकता भासणार नाही. याशिवाय महामार्गांवर १०० किलोमीटर अंतरावर फास्ट चार्जिंग स्टेशन लावण्यात येईल. पुढील एका वर्षात मोठमोठ्या शहरात २७०० चार्जिंग स्टेशन लावण्यात येईल.

सोसायटी ऑफ मॅन्यूफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकलसाठी च्या मते, फक्त चार्जिंग स्टेशन सुरु करुन भागणार नाही तर बॅटरी स्पॅपिंग स्टेशन लावावे लागतील. जेणे करुन इलेक्ट्रिक वाहनांना प्रोस्ताहन मिळेल.

बॅटरी स्वॅपिंग स्टेशन अनेक प्रकारचे असू शकतीत. एक मोठे स्टेशन असतील जे पेट्रोल पंपावर असतील. जेथे मोठ्या प्रमाणात बॅटरी स्वॅपिंगची सुविधा देण्यात येईल. किराणा दुकानात दोन चार्ज बॅटरी ठेऊन स्वॅपिग स्टेशन सुरु केले जाऊ शकतात. दुचाकी स्वार आपली बॅटरी डिस्चार्ज झाल्यावर किराणा दुकानातून चार्ज करुन घेऊ शकतात आणि त्याबदल्यात किराणा दुकानांना शुल्क देऊ शकतात. एसएमईव्ही च्या मते या प्रकारच्या कामासाठी अनेक स्टार्टअप कंपन्या पुढे येत आहेत.

तज्ञांच्या मते, शक्यतो २५-३० किलोमीटर मार्गावर दुचाकी स्वार वाहन चालवतात. जर किराणा दुकानात चार्ज बॅटरी उपलब्ध करुन देण्यात आले तर दुचाकी स्वारांना बॅटरीची चिंता राहणार नाही. किराणा दुकानदार फक्त ३००० रुपये लावून दुचाकी स्वारांना वाहन बॅटरी स्वॅपिंगची सुविधा देऊन व्यवसाय सुरु करु शकतात. एका बॅटरीची किंमत १५००० रुपये असेल.

शाळकरी मुलांच्या आरोग्यासाठी डबेवाल्यांचा पुढाकार

मुंबईत जून महिन्यात हेपेटायटिसच्या रूग्णांची संख्या वाढली

मुख्यमंत्र्यांची आमदारकी धोक्यात ? २३ जुलै ला फैसला !

य़ेरवडा कारागृहात टोळीयुद्ध जोमात, नक्की चाललंय तरी काय ?