गायीच्या शेण आणि गोमूत्रापासून उत्पादने बनवण्याचा व्यवसायास मोदी सरकारचं 60 % ‘फंडिंग’, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भाजपचे केंद्रीय नेतृत्व सध्या गोमातेपासून तयार होणारे आणि त्यांच्या वस्तूंपासून तयार होणाऱ्या बायप्रॉडक्ट्च्या वापरावर जोर देत आहेत. मात्र आता केंद्र सरकारने स्वतः या मोहिमेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच हि मोहीम देखील केंद्र सरकारच्या मदतीने पुढे नेली जाणार आहे. त्यामुळे आता गायीच्या शेणापासून तसेच गोमूत्रापासून तयार होणाऱ्या वस्तूंवर सरकार मोठी मदत देणार आहे.

शेणाचा तसेच गोमुत्राचा औषधांमध्ये वापर
राष्ट्रीय कामधेनु आयोगाच्या अध्यक्षांनी याविषयी सांगितले कि, या उत्पादनांपासून वस्तू तयार करण्यासाठी केंद्र सरकार त्यांना मदत देखील करणार आहे. या व्यवसायासाठी केंद्र सरकार 60 टक्के भांडवलाची मदत करणार आहे. वल्लभ कठेरिया यांच्या मते गाईंपासून तयार होणाऱ्या दूध आणि तुपाच्या वापराऐवजी आम्ही शेण आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या वस्तूंच्या वापराला प्रोत्साहन देणार आहोत.

500 कोटी रुपये निधीसह कामधेनु आयोगाची सुरुवात
केंद्र सरकारने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 500 कोटी रुपये निधी देऊन या आयोगाची स्थापना केली आहे. या आयोगाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे गाईच्या शेण आणि गोमूत्रापासून तयार होणाऱ्या बायप्रोडक्ट्सचा प्रचार करणे. तसेच या तयार झालेल्या वस्तूंचा वापर हा औषधे तयार करण्यासाठी देखील व्हावा हा देखील मुख्य उद्देश आहे.

Visit – policenama.com