खुशखबर ! सलग तिसर्‍या दिवशी पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सलग तिसऱ्या दिवशी घसरण झाली असून आज पेट्रोल 12 पैश्यांनी तर डिझेलदेखील 14 पैसे प्रतिलिटरने कमी झाले आहे.

चार महानगरांमधील पेट्रोल आणि डिझेलचे दर

आज राजधानी दिल्लीत पेट्रोलचे दर 73.32 रुपये लिटर झाले आहेत. 12 पैश्यांची आज पेट्रोलमध्ये घसरण झाली आहे. त्याचबरोबर दिल्लीत डिझेलचे देखील कमी झाले आहेत. 14 पैश्यांनी कमी होऊन दिल्लीत आज डिझेलचा दर 66.40 रुपये प्रतिलिटर झालं आहे.

पेट्रोलमध्ये १२ पैश्यांची घट झाली असून मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 78.93 रुपये लिटर झाले आहेत. मुंबईत आज डिझेलचा दर 69.66 रुपये प्रतिलिटर आहे. डिझेलच्या दरात 14 पैश्यांची घट झाली आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर 75.97 रुपये लिटर झाले आहेत. तर डिझेलचा दर 69.66 रुपये प्रति लीटर झाला आहे. तर कोलकात्यात पेट्रोलचे दर 75.97 रुपये लिटर झाले आहेत. तर डिझेलचा दर 68.82 रुपये प्रति लीटर झाला आहे

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील काही दिवसांपासून कच्च्या तेलाच्या दरात झालेल्या घसरणीमुळे भारतात देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्यात नयेत आहे. त्यामुळे सणासुदीच्या दिवसांत जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे.

Visit : Policenama.com

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like