‘बिल’ न मागितल्यास १० ग्राम ‘सोने’ मिळेल ‘एवढ्या’ रुपयाने ‘स्वस्त’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने खरेदीवर तुम्ही तुमचे पैसे वाचवू शकतात. सोने खरेदी करण्यासाठी जाणार असाल तर तुमच्याकडे दोन पर्याय आहेत. एक पर्याय तुम्ही बिल घेऊन सोने खरेदी करा आणि दुसरा पर्याय बिल न घेता सोने खरेदी करा. दिल्लीत सराफ बाजारात ५ जुलैनंंतर ही पद्धत वापरात आली आहे.

याशिवाय इतर शहरात देखील तुम्ही ही पद्धत उपलब्ध असल्याचे पाहू शकतात. दुसरा पर्याय तुम्ही निवडलात तर तुम्ही प्रति १० ग्राम मागे १५०० रुपयांचा फायदा मिळवू शकतात. जर सोन्याची किंमत ३५,००० रुपये १० ग्राम असेल तर विना बिलाच्या खरेदीवर तुम्हाला ३३,५०० रुपये प्रति १० ग्राम किंमतीने सोने मिळेल.

सोन्यावर ३ टक्के जीएसटी
व्यवसायिकांच्या मते ५ जुलैला अर्थसंकल्प जाहीर केल्यानंतर सोन्यावर आयात शुल्क १०.५ टक्क्यांवरुन वाढवून १२.५ टक्के करण्यात आला आहे. सोन्यावर ३ टक्के जीएसटी देखील लागतो. म्हणजेच बिना बिलाच्या खरेदीवर 5.5 टक्के बचत होते. एक लाख रुपयांचे सोने खरेदीवर ५५०० रुपये बचत होईल.

सराफ व्यवसायिकांच्या मते, आयात शुल्क वाढल्याने स्मगलिंगचे प्रकार वाढले आहेत. कारण एका किलोग्राम सोन्यावर २ – २.५ लाख रुपये बचत होते. अनेक ग्राहक बऱ्याच वेळा एकाच दुकानातून सोने खरेदी करतात, तर ते देखील सराफांकडे बिना बिलाची सोन्याची खरेदी करतात.

१०० ग्राम सोन्यावर होईल १५००० रुपयांची बचत
सराफ व्यापाऱ्यांच्या मते सोन्यात आधिकृत पणे आयातीत कमी आली आहे. परंतू मागच्या दाराने मोठ्या प्रमाणात सोन्याचा सप्लाय होत असतो. कारण मागच्या दाराने येणाऱ्या सोन्यात आणि बिल घेऊन खरेदी केलेल्या सोन्यात मोठा फरक असतो. लग्न सणासुदीला ग्राहक ५० ते १०० ग्राम सोने खरेदी करतात, अशा वेळी १०० ग्राम सोने खरेदीवर ग्राहकांची १५,००० रुपयांपर्यंत बचत होऊ शकते.

आरोग्यविषयक वृत्त –