या रक्षाबंधनला बहिणीला द्या ‘या’ वस्तू गिफ्ट म्हणून 

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – भारतात रक्षाबंधन या सणाला विशेष महत्व आहे. या वर्षी हा सण उद्या साजरा होणार असून या निमिताने बाजारात मोठ्या प्रमाणात वस्तूंची विक्री वाढलेली पाहायला मिळत आहे. या दिवशी बहिणीने भावाला राखी बांधल्यानंतर तिला काहीतरी बक्षीस देण्याची प्रथा आहे. आज आम्ही तुम्हाला असाच पाच बक्षिसांविषयी सांगणार आहोत जे उद्या तुम्ही तुमच्या बहिणीला भेट म्हणून देऊ शकता.

१) स्मार्टफोन

आजकाल मुलींना सेल्फी काढण्याचा मोठ्या प्रमाणात शौक असतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या बहिणीला मोबाईल गिफ्ट देऊ शकता. बाजारात मोठ्या प्रमाणात सेल्फी कॅमेरे आलेले आहेत.  Oppo K3, Vivo V11 आणि Huawei P20 Pro यांसारखे चांगले स्मार्टफोन नुकतेच बाजारात आले आहेत. त्याचबरोबर आणखीही अनेक फोन बाजारात उपलब्ध आहेत. १० ते १५ हजार रुपयांपर्यंत तुम्हाला हे फोन सहज उपलब्ध होतील.

२) वायरलेस ईयरबड्स

गाणे ऐकायला कुणाला नाही आवडत ? त्यामुळे या दिवशी तुम्ही बहिणीला हे सुंदर गिफ्ट देऊ शकता. वेगवेगळ्या रंगात उपलब्ध असलेले हे गॅजेट मुलींना मोठ्या प्रमाणात आवडतात. १० ते १२ हजार रुपयांपर्यंत तुम्हाला हे सहज उपलब्ध होऊ शकतात.

३) टायमॅक्सचे घड्याळ

भारतीय बाजारात या अमेरिकन कंपनीच्या घड्याळाने गारुड केले आहे. वेगवेगळ्या रंगात आणि आकारात हि घड्याळे तुम्हाला मिळतील. जर तुमच्या बहिणीला स्टायलिश घड्याळे घालायला आवडत असतील तर तुम्ही बहिणीला हे उत्तम गिफ्ट देऊ शकता. ४ ते ५ हजार रुपयांपर्यंत याची किंमत आहे.

४) स्मार्टवॉच

जर तुमची बहीण फिटनेस फ्रिक असेल तर तुम्ही तिला हे स्मार्टवॉच गिफ्ट करू शकता. ५०० रुपयांपासून ते ५००० रुपयांपर्यंत हि घड्याळे बाजारात उपलब्ध आहेत.

५) गिफ्ट हॅम्पर 
यामध्ये तुम्ही बहिणीला कोणत्याही प्रकारचे गिफ्ट देऊ शकता. यामध्ये चॉकलेट, मेकअप किट, सॉफ्ट टॉय यांसारख्या वस्तूंचा समावेश आहे. त्याचबरोबर एखादा सोन्याचा दागिना देखील तुम्ही बहिणीला गिफ्ट करू शकता.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like