राज्यस्तरीय योगा पंच परिक्षेत मोनाली सैंदाणे धुळे जिल्ह्यातून प्रथम

धुळे : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र योगा असोसिएशन तर्फे तिसरी राज्यस्तरीय योगा पंच परिक्षा २०१९ ही न्यु मराठा स्कूल गंगापूर रोड नासिक येथे संपन्न झाली. या परिक्षेत राज्यातील सर्व जिल्ह्यांचे एकूण १४५ योग शिक्षकांनी सहभाग नोंदवला.या परिक्षेत धुळे जिल्ह्यातून मोनाली सैंदाणे / पगारे यांनी सहभाग घेऊन परिक्षेत १५० पैकी ८४ गुण मिळवून उत्तीर्ण होऊन धुळ्यातील प्रथम महिला राज्यस्तरीय योगा पंच होण्याचा बहुमान पटकावला.

मोनाली सैंदाणे/पगारे ह्या सध्या धुळे जिल्हा पोलिस दलात कार्यरत आहे. त्या योगविद्याधाम धुळे येथील योगशिक्षिका आहे. तसेच योगा, जिम्न‌ॅस्टीक, ज्युदो, तायक्वांदो या खेळांमध्ये शालेय राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी दर्शवली आहे.तसेच महाराष्ट्र राज्य पोलीस क्रिडा स्पर्धेत यश संपादन करून पदक पटकाविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल धुळे जिल्हा पोलिस दल, धुळे जिल्हा योगा असोसिएशन, योगविद्याधाम धुळे , अॅडव्हेंचर्स स्पोर्टस अॅकेडमी धुळे तसेच सैंदाणे व पगारे परिवार या सर्वांनी अभिनंदन व कौतुक केले.

आरोग्यविषयक वृत्त –