‘वेडिंग अ‍ॅनिव्हर्सरी’ निमित्त पतीबरोबर मोनालिसाचं शानदार ‘सेलिब्रेशन’, शेअर केले फोटो

पोलीसनामा ऑनलाईन : अभिनेत्री मोनालिसा आणि तिचा नवरा विक्रांत यांच्या लग्नाला 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. आज ते आपल्या लग्नाचा चौथा वाढदिवस साजरा करताना दिसले. दोघांनीही या सेलिब्रेशनचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये तुम्ही पाहु शकता की या खास प्रसंगी दोघे चॉकलेट केक कापताना दिसत आहेत. या आनंदाच्या प्रसंगी त्यांचे चाहते या दोघांना खूप शुभेच्छा देत आहेत. केवळ चाहतेच नव्हे तर इंडस्ट्रीच्या काही खास मित्रांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

मोनालिसा आणि विक्रांतने शेअर केले फोटो

लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मोनालिसा आणि विक्रांतने त्यांच्या इंस्टाग्रामवर एकमेकांना शुभेच्छा देणारा एक फोटो देखील शेअर केला. मोनालिसाने एक फोटो शेअर केला आहे, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने एक रेड फ्लोरल ड्रेस परिधान केला आहे, तर तिचा नवरा विक्रांतने लेमन यलो शर्ट घातला आहे. मोनालिसाने फोटो शेअर केल्यानंतर विक्रांतचे देखील फोटो पाहायला मिळाले, ज्यात मोनालिसा ब्लू ड्रेसमध्ये सुंदर दिसत आहे. यामध्ये विक्रांत व्हाईट शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये हँडसम दिसत आहे. त्याने फोटो शेअर करताना लिहिले, “अच्छा सुनो,,,, शादी की सालगिरह मुबारक हो”

मोनालिसा आणि विक्रांतच्या फोटोंवर त्यांचे चाहते लाईक्स आणि कमेंट्सद्वारे त्यांना खूप प्रेम देत आहेत. एका चाहत्याने “जोडी नंबर वन” असे लिहिले तर दुसर्‍याने “परफेक्ट” असे दोघांचे वर्णन केले. चाहत्यांसोबतच या जोडप्याच्या मित्रांनीही या दोघांना शुभेच्छा दिल्या, ज्यामध्ये सुरभी चांदना, सायंतनी घोष आणि आशका गोराडिया यांचा समावेश आहे.

नॅशनल टीव्हीवर केले दोघांनी लग्न

बिग बॉसच्या 10 व्या सीझनमध्ये मोनालिसा आणि विक्रांतचे लग्न झाले होते. मोनालिसा शो चा भाग होण्यापूर्वीच दोघेही रिलेशनशिपमध्ये होते. शो च्या निर्मात्यांनी दोघांचे लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी विक्रांतला लग्नाच्या प्रस्तावाची कल्पना दिली, ज्यास विक्रांतने मान्य केले. विक्रांतने त्यावेळी सांगितले होते की, “मी या गोष्टीसाठी लगेच होकार दिला होता, कारण मी आणि मोनाने आमच्या नात्याला पुढे नेण्याचा निर्णय घेतला होता. सुदैवाने बिग बॉसमधील लोकांना हे माहित होते आणि त्यांनी मला विचारले ‘की मी मोनाशी नॅशनल टीव्हीवर लग्न करण्यास इच्छुक आहे काय?’ मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो की मी मोनाशी इतक्या मोठ्या व्यासपीठावर लग्न करणार आहे, तसेच मी निर्मात्यांचे देखील आभार मानतो.”