‘ही’ पूजा केल्यास प्रसन्‍न होईल माता’लक्ष्मी’, त्यानंतर होणार ‘धन’लाभ

पोलीसनामा ऑनलाईन टीम : सोमवारच्या दिवशी शिवाबरोबर शक्तीचीही पूजा करण्याचे संकेत शास्त्रानुसार आहेत. आजच्या दिवशी लक्ष्मीमातेची पूजा केल्यानंतर देवीची आपल्यावर विशेष कृपा होऊ शकते आणि तुम्हाला हवे ते फळ मिळेल. आपल्या अध्यात्मिक शास्त्रात देवीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय सांगितले गेले आहेत.

जाणून घेऊयात त्यांबद्दल थोडेसे-

लक्ष्मीमातेचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी पूजेमध्ये लाल रंगाच्या फुलांचा वापर विशेषकरून करायला हवा मात्र जर तुम्हाला देवीला लवकरात लवकर प्रसन्न करायचे असेल. तर सोमवारच्या दिवशी कमळाचे फुल चढवावावे. कारण धनाची देवी असणाऱ्या लक्ष्मी ला कमळाचे फुल अत्यंत प्रिय असते आणि या फुलाचा वापर करून पूजा केल्यास लवकरच आशीर्वादरुपी धनसंपदा प्राप्त होते.

शक्तीची साधना करताना कित्येक वेळा आपण इतके हरवून जातो कि, पूजेमधील कित्येक नियमांचे भानदेखील आपल्याला राहत नाही आणि विधीमध्ये चुका होऊ शकतात. याचादेखील उपाय आपल्या धर्मशास्त्रात दिला आहे. जर पूजेमध्ये आपल्याकडून काही चुक भूल झाल्यास दुर्गा सप्तशती च्या शेवटी एक प्रार्थना असते ती प्रार्थना वाचून देवीची माफी मागता येऊ शकते. यानंतरच तुमची पूजा पूर्ण होते. परंतु देवी भगवती ची पूजा करताना ती मनःपूर्वक आणि अचूक होईल काळजीपूर्वक लक्ष द्यावे.

घरातील नकारात्मक ऊर्जा घालविण्यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर स्वस्तिकची चिन्ह बनवायला विसरू नका. याचबरोबर कार्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी गणपतीचीही पूजा अवश्य करावी. लक्ष्मीमातेचे अनेक प्रकारचे फोटो आपल्याला पहावयास मिळतात. परंतु शास्त्राच्या म्हणण्यानुसार कमळाच्या फुलावर बसलेल्या लक्ष्मीची पूजा करणे अत्यंत शुभ असते.

आर्थिक समस्या दूर करण्यासाठी लक्ष्मीमातेला लाल कपडा आणि कवडी अर्पण करावी. यानंतर तो लाल कपडा आणि कवडी आपल्या पैसे ठेवण्याच्या जागेवर ठेवावी याने तुमच्या धनामध्ये वृद्धी होते.

आरोग्यविषयक वृत्त

केस काळे ठेवण्यासाठी हे “प्राणायम” करते मदत

वजन कमी करण्यासाठी “व्हिटॅमिन डी ” उपयुक्त

घरगुती उपायांनी काढा चेहऱ्यावरील नको असलेले केस

मनुष्य शरीरातील हाडांविषयी हे माहित आहे का ?

हस्त मुद्रेने घालवा मूळव्याध आणि युरिनची समस्या

You might also like