टेक्नोलाॅजीताज्या बातम्या

Money | जर तुमच्याकडे सुद्धा आहे Airtel चे सिम तर मिळेल 4 लाख रुपयांचा फायदा, जाणून घ्या कसा?

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  Money | जर तुमच्याकडे सुद्धा एयरटेल (Airtel) चे सिम आहे तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. कारण, कंपनी रिचार्ज प्लानवर थेट 4 लाख रुपयांचा (Money) फायदा देत आहे. हा फायदा 279 रुपयांच्या रिचार्ज प्लानवर मिळत आहे. जीवन विमा किंवा आरोग्य विम्याचा फायदा घेण्यासाठी प्रीमियम भरावा लागतो. परंतु काही कंपन्या किंवा सरकारी योजना तुम्हाला जीवन किंवा आरोग्य विमा मोफत देतात. याबाबत जाणून घेवूयात…

Airtel देत आहे 4 लाखाचा टर्म लाइफ इन्श्युरन्स

एयरटेल 279 रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लानवर 4 लाख रुपयांचा टर्म लाईफ इन्शुरन्स मिळत आहे. तर 179 रुपयांच्या प्रीपेड रिचार्जवर 2 लाखांचा लाईफ इन्श्युरन्स देत आहे.

जनधन अकाऊंटवर विमा

जनधन योजनेच्या बँक खात्यावर मिळणार्‍या रूपे डेबिट कार्डवर 30 हजार रुपयांचा जीवन विमा आणि दोन लाख रुपयांचा व्यक्तिगत अपघात विमा कव्हर मिळते.

PNB देते फ्री अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स

पंजाब नॅशनल बँक RuPay Platinum Debit Card वर 2 लाख रुपयांचा फ्री अ‍ॅक्सिडेंटल इन्श्युरन्स देत आहे.

EPFO देते 7 लाख रुपयांचे इन्शुरन्स कव्हर

EPFO मेंबर्सला एम्प्लॉई डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीम (EDLI Insurance cover) अंतर्गत नॉमिनीला कमाल 7 लाख रुपये इन्श्युरन्स कव्हर देते.

LPG वर 50 लाख रुपयांचा विमा

LPG कनेक्शनसोबत ग्राहकाला पर्सनल अ‍ॅक्सीडेंट कव्हर मिळतो. 50 लाख रुपयांपर्यंत हा विमा LPG सिलेंडरमधून गॅस लीकेज किंवा ब्लास्टमुळे दुर्घटनेच्या स्थितीत आर्थिक मदत देतो.

 

Web Title : money | airtel give 4 lakh rupees benefits with 2 recharge plan and many schemes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

EPFO | 6.5 कोटी नोकरदारांसाठी खुशखबर ! यावेळी PF खात्यात येतील जास्त पैसे, EPFO ने दिली ही महत्वाची माहिती

LPG Connection | खुशखबर ! मोदी सरकार देणार मोफत गॅस कनेक्शन, कोणत्याही पत्त्यावर घेऊ शकता; लागू करताहेत ‘हा’ नियम

Corona Vaccine | व्हॅक्सीनचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांमध्ये कोविड संसर्गाचा धोका तिप्पटीने कमी, स्टडीत दावा

Back to top button