पैशाचा वाद अन् दुकान टाकले जाळून

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – पैशाच्या व्यवहारातीव वादातून भंगाराचे दुकान पेटून देऊन जाळून टाकले. यात दुकानातील माल जळून खाक झाला. त्यात दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले. नालेगावातील संभाजी व्यापारी संकुल येथे काल सायंकाळी ही घटना घडली.

याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पप्पू शिंदे (रा. वारुळाचा मारुती मंदिराजवळ, नालेगाव) याच्याविरुद्ध जाळपोळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, किरण रतन त्रिभुवन यांचे बंधू व पप्पू शिंदे यांच्यात पैशाचे व्यवहार होते. यातून दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरू झाले. त्या वादातून शिंदे याने त्रिभुवन यांची भंगाराची टपरी जाळून टाकली. त्यात दुकानातील माल जळून मोठे नुकसान झाले. तसेच त्रिभुवन यांच्या आईला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली.

याबाबत किरण त्रिभुवन यांच्या फिर्यादीवरून पप्पू शिंदे यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक ए. के. पवार या करीत आहेत.