बीड : साडेसात लाख रुपये रक्कम असलेली बॅग पळवली

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – साडे सात लाख रुपयाची बॅग घेऊन नात जावयासोबत जातअसलेल्या वृद्ध महिलेच्या हातातील बॅग दोन अज्ञात लोकांनी दुचाकीवरून पळवून नेली. ही घटना सकाळी ९ ते ९:३० वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुभद्राबाई केशव नागरगोजे (वय ७५) राहणार गुंदा वडगाव (तालुका बीड) यांनी सोमवार (दि. २२ जुलै ) रोजी आर्थिक व्यवहारासाठी एसबीआय बँक बीड येथून सात लाख रुपये काढले होते परंतु गावात जत्रा चालू असल्याने तो व्यवहार झाला नाही. आज ते पैसे वापस बॅंकेत टाकण्यासाठी त्या नात जावई प्रदीप चौरे सोबत बीडला निघाल्या होत्या. जात असताना जावई प्रदिप चौरे याला लघवी आल्याने गाडी रोडच्या बाजूला उभी करून ती बॅग सुभद्राबाई यांच्याकडे दिली.

दरम्यानच्या काळात त्याच रस्त्यावरून आलेल्या दोन अज्ञात मोटारसायकल स्वारांनी सुभद्राबाई यांच्या हातातील साडेसात लाख रुपयाची रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली आणि मोटारसायकलवरून धूम ठोकली. अचानक झालेल्या या घटनेनंतर सुभद्राबाई ओरडल्या. त्यांचा आवाज ऐकून प्रदीप चौरे यांनी मोटारसायकलवरून चोरांचा पाठलाग केला पण तत्यांना चोर सापडले न नाहीत.

या घटनेची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयात देण्यात आली आहे. चोरांचा शोध घेण्यासाठी गुंदावडगाव आणि पिंपळनेरकडून जाणाऱ्या सर्व रस्त्यावर पोलिसांनी नाकाबंदी केली आहे.

You might also like