मोदी सरकारच्या ‘या’ निर्णयामुळं खुप मोठं नुकसान ; शेअर बाजारात घसरण, झालं ‘एवढया’ लाख कोटींचं नुकसान !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आज शेअर बाजारात गुंतवणुकदारांनी केलेल्या विक्रीमुळे प्रचंड घसरण झाली आहे. सकाळी सेन्सेक्स ५६०.४५ अंकांवर होता, मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या विक्रीमुळे संध्याकाळी ३८,३३७वर आला आहे. तर निफ्टीच्या अंकातही मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. निफ्टीमध्ये ११७.६५ अंकांनी घसरून ११,४१९वर आला आहे. शेअर बाजार आज झालेली घसरण गेल्या दोन महिन्यातील सर्वांत मोठी घसरण आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पातील बदलामुळे ही घसरण झाली आहे. अर्थसंकल्पानुसार परदेशी गुंतवणूकदार वाढलेल्या सरचार्जवर सवलत मागत आहेत. त्यांनी कंपनी म्हणून रजिस्ट्रेशन करून गुंतवणूक करावी, अशी अट ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शेअर बाजाराची स्थिती घसरली आहे. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात जोरदार विक्री केल्याचेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

शेअर बाजारात झालेल्या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. फक्त एका दिवसात गुंतवणुकदाराते २.०८ लाख कोटी रुपये बुडाले आहेत. गुरुवारी लिस्टेड कुल कंपनींचा मार्केट कॅप १,४७,४६,५३४.८९ कोटी रुपये होता. तोच आज घसरून १,४५,३८,३८५.१२ रुपये झाला आहे.

दरम्यान, सरकारच्या या निर्णयानं शेअर बाजारावर परिणाम झालाय. अशात शेअर बाजाराची घसरण वाढत जाण्याची शक्यता असल्याचे एसकोर्ट सिक्युरिटीचे रिसर्च हेड आसिफ इकबाल यांनी सांगितलं आहे. तसंचं या काळात म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारात गुंतवणुक वाढेल. गुंतवणूकदारांनी चांगलं फंडामेंटल आणि गुड गव्हर्नंसवाल्या कंपनींच्या शेअरमध्ये पैसे गुंतवायला हवेत. शिवाय सरकारी बॉण्ड्सवाल्या योजनाही घेतल्या पाहिजेत, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

You might also like