‘हा’ व्यवसाय करा अन् दरमहा एक लाख रूपये कमवा, जाणून घ्या

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – सध्या हवामानाचा काही भरोसा राहिलेला नसल्यामुळे शेती करणे खूप कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे शेतकऱ्याला शेतीसोबत एका जोडधंद्याची गरज भासू लागली आहे. आज आम्ही तुम्हाला अशा जोडधंद्याबाद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही दर महिन्याला कमीतकमी एक लाख रुपये कमाऊ शकता. विशेष म्हणजे या जोडधंदयासाठी तुमचा सरकारकडून मोठ्या प्रमाणावर मदत देखील मिळेल. कुकुटपालन या जोडधंदा शेतीसोबत अगदी सहज पद्धतीने करता येऊ शकतो आणि यासाठी तुम्हाला 5 ते 10 लाख रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.

एकूण खर्च किती लागणार, महत्वाच्या गोष्टी कोणत्या
छोट्या स्तरावर हा व्यवसाय सुरु करायचा असल्यास 1500 कोंबड्या विकत घेऊन याची सुरुवात केली तर किमान 50 हजार ते एक लाखांपर्यंत तुम्हाला महिन्याला तुम्ही कमवू शकता. काही वेळा कोंबड्या आजारी पडतात, किंवा रोगामुळे त्यांचा मृत्यू होतो. अशा सर्व गोष्टींचा विचार करून किमान 1500 कोंबड्या घेणं आवश्यक आहे. तसेच यासाठी तुमची स्वत: ची जागा असणं आवश्यक आहे, कोंबड्यांसाठी लागणारा थोडा मोठा पिंजरा आणि इतर साहित्य घेण्यासाठी साधारण 5 लाख रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

कोंबड्या खरेदीच बजेट
एक लेयर पॅरेंट बर्थची किंमत साधारण 30 ते 35 रुपये असते.
साधारण कोंबड्या खरेदी करण्यासाठी 50 ते 60 हजार रुपयांची आवश्यकता आहे.
त्यातही कोंबड्यांची जात आणि त्यासाठी आवश्यक असणारे खाद्य पदार्थ, औषध आणि लसीकरणाचा खर्च याचंही बजेट बसवायला हवं.
20 आठवड्यांचा खर्च साधारण 3 ते 4 लाख रुपये येतो.
कोंबड्यांच्या खाण्याचा खर्च साधारण या 20 आठवड्यांमध्ये एक ते दीड लाख रुपये होतो.

फॉर्मल ट्रेनिंगची आहे आवश्यकता
हा व्यवसाय करण्यासाठी एका फॉर्मल ट्रेनिंगची आवश्यता असते. कोंबड्याना हाताळायचे कसे त्यांचा आहार कशा स्वरूपाचा हवा आणि एकूणच सर्व कामकाज कसे चालते याबाबतची सर्व माहिती या ट्रेंनिंगमध्ये दिली जाऊ शकते. म्हणून हे ट्रेनिंग आवश्यक आहे तेव्हाच हा व्यवसाय तुम्ही योग्य पद्धतीने करू शकता.

किती होईल फायदा
साधारण विचार केला तर 1500 कोंबड्यांपासून प्रत्येकी 290 अंडी प्रतिवर्षाला मिळाली तर 4 लाख अंडी तुम्ही विकू शकता. एका अंड्याची किंमत 3.5 रुपये असा विचार केला तर फक्त अंडी विकून तुम्ही वार्षिक साधारणतः 14 लाखांपर्यंत कमाई करू शकता.

Visit : Policenama.com