खुशखबर ! ‘शुन्य’ (0) बॅलन्स असणार्यांना देखील आता ‘चेकबुक’ आणि ‘ATM’ कार्ड मिळणार मोफत
मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बचत खात्यांवर व्याजदर कमी केल्यानंतर बँका एकीकडे विविध प्रकारचे शुल्क आकारत असते. याचा थेट परिणाम ग्राहकाच्या खिशावर होत असतो अशा परिस्थितीत बेसिक सेव्हिंग बँक अकाउंट ( BSBD ) असलेल्या ग्राहकांसाठी खुशखबर आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने BSBD संदर्भातील काही नियम शिथिल केले असून या खातेधारकांना आता चेक बुक आणि इतर सुविधा मिळणार आहेत. तसेच बँक ग्राहकांना या सुविधांसाठी खात्यात कमीत कमी पैसे ठेवण्याची सक्ती करू शकत नाही.
नवीन नियमांनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांना बचत खात्याप्रमाणे बीएसबीडी खात्यालाही सुविधा द्यायला सांगितलंय. यात कुठल्याही शुल्काशिवाय बँकेनं काही ठराविक सेवांबरोबर चेक बुकसारखी सुविधाही द्यावी.तसेच बीएसबीडी खातेधारकांना आपल्या खात्यात कमीत कमी पैसेही ठेवण्याची गरज नाही. तसेच त्यांना एटीएम सेवाही चार वेळा फ्री मिळणार आहे. खात्यात कमीत कमी किती पैसे ठेवायचे यालाही मर्यादा नाही.
अनेक जण बँकेनं निश्चित केलेली रक्कम खात्यात ठेवू शकत नव्हते त्यामुळे आता याचा फायदा अनेकांना होणार आहे. त्यांना इतर सुविधा मिळणं अवघड जातं होतं. पण आता रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने च्या या नवीन निर्णयाने सर्वांना हा दिलासा मिळणार आहे.
सेक्स शरीरासाठी आवश्यक, पहा तज्ज्ञ काय सांगतात
अहंकार आणि भीती दूर करण्याचे प्रभावी साधन ‘योगा ‘
कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय
‘या’ आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर