home page top 1

धक्कादायक ! पहिली असताना दुसरीशी ‘झेंगाट’, पहिलीला सोडण्यासाठी दुसरीला पैशांची मागणी

अकोला : पोलिसनामा ऑनलाईन – अकोला जिल्ह्यातील पातूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी दुसऱ्या पत्नीवर दबाव टाकत तिच्याकडे पाच लाखांची मागणी करत तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. दुसऱ्या पत्नीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पतीच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.

अकोलामधील पातूर मधील जियाउल्ला खान अताउल्ला खान याचा एका तरुणीशी विवाह झाला होता. लग्नानंतर तिचा सासरच्यांकडून छळ करण्यास सुरुवात झाली. त्याचबरोबर लग्नात चारचाकी गाडी दिली नाही म्हणून देखील तिचा मोठ्या प्रमाणावर छळ करण्यात येत होता. त्याचदरम्यान त्या तरुणीला आपल्या पतीचा दुसरा विवाह झाल्याचे समजले. याविषयी तिने विचारणा केली असता संगितले कि, पहिली पत्नी दहा लाख रुपये मागत आहे. त्यामुळे तिला देण्यासाठी माहेराहून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी त्याने तिच्याकडे केली. मात्र तिने यासाठी नकार दिला असता सासरच्यांनी तिचे काहीही न ऐकता तिला घरात डांबून मारहाण केली. यानंतर तिने स्वतःची सुटका करून घेत थेट पोलीस स्टेशन गाठत या अत्याचाराविषयी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात तक्रार दाखल करून घेतली असून पती जियाउल्ला खान अताउल्ला खान, अताउल्ला खान, इमरान खान अताउल्ला खान व आणखी चार महिलांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 घोरण्याच्या समस्येवर ‘या’ ६ घरगुती उपायांनी ‘कंट्रोल’ करा

बकरीच्या दुधाचे ‘हे’ आहेत आश्चर्यचकित करणारे फायदे, जाणून घ्या

नेहमीच आद्रक चहा पिणे योग्य नाही ; होऊ शकतो ‘हा’ त्रास

 ‘सीसी क्रीम’ म्हणजे काय ? याचा वापर केल्यामुळे होतात फायदे आणि नुकसान

 ‘हे’ फळं खा आणि मधुमेहावर नियंत्रण मिळवा

 कच्ची पपई खाल्याने होतात ‘हे’ ३ फायदे, जाणून घ्या

Loading...
You might also like