धक्कादायक ! ISRO च्या खुनाचं ‘गूढ’ उकललं, लॅब टेक्निशियन बरोबरच होते समलिंगी संबंध

हैदराबाद : वृत्तसंस्था – इस्त्रोचे शास्त्रज्ञ एस. सुरेश कुमार यांचा काही दिवसांपूर्वी खून झाला होता. या घटेनमुळे देशभरात खळबळ उडाली होती. खूनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी सर्व शक्यता पडताळून पाहिल्या होत्या. हैदराबाद पोलिसांनी या गुन्ह्याचा उलगडा केला असून तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. कुमार यांचे त्यांच्याच लॅब टेक्निशनबरोबर समलिंगी संबंध होते. यातून पैसाच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात उघड झाले आहे.

पोलिसांनी लॅब टेक्निशनला ताब्यात घेऊन चौकशी केली असता ही धक्कादायक माहीती समोर आली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. सुरेश कुमार हे इस्रोच्या National Remote Sensing Agency (NRSA) मध्ये शास्त्रज्ञ होते. त्यांचे त्यांच्याच लॅबमधल्या जे श्रीनिवास या टेक्निशनबरोबर समलिंगी संबंध होते.

सुरेश कुमार हे हैदराबादमधील अमीरपेट भागात राहत होते. श्रीनिवास हा कुमार यांच्याकडे नियमीत येत होता. गेल्या काही दिवसांपासून त्या दोघांचे संबंध होते. त्यामुळे श्रीनिवास हा कुमार यांच्या घरात मुक्काम करत होता. श्रीनिवास हा संबंधासाठी कुमार यांच्याकडून पैसे घेत होता. या पैशांच्या बदल्यात त्याची या संबंधांना परवानगी होती असे स्पष्ट होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेच्या दिवशी आरोपी श्रीनिवास हा कुमार यांच्या घरी मुक्कामाला होता. त्यावेळी लैंगिक संबंधानंतर त्याने कुमार यांच्याकडे पैशांची मागणी केली. यातूनच दोघांमध्ये वाद झाले. याच वादातून आरोपीने कुमार यांचा खून केला. खून केल्यानंतर आरोपीने कुमार यांच्याकडे असलेले सोने, अंगठी आणि दहा हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. घटनेनंतर पोलिसांनी पुरावे गोळा करून श्रीनिवास याला ताब्यता घेतले. त्याला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली देत सर्व माहिती सांगितल्याचे पोलिसांनी सांगितले.