Money | सर्वसामान्यांना पुन्हा महागाईचा फटका ! 1 डिसेंबरपासून महाग होणार ‘या’ गोष्टी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डिसेंबर महिन्यापासून महागाचा फटका (Money) आणखी तीव्र होऊ शकतो. कारण 1 डिसेंबरपासून अनेक वस्तू आणि सेवा महागणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर (Money) होणार आहे. जर तुम्हाला याबाबत माहिती नसेल आणि 1 डिसेंबरनंतर जेव्हा हे तुमच्या समोर येईल, तेव्हा अस्वस्थ होऊ शकता.

– 14 वर्षानंतर वाढणार आहे माचिसचा दर
1 डिसेंबरपासून माचिसच्या पेटीची किंमत सध्याच्या 1 रुपयावरून वाढून थेट दुप्पट म्हणजे 2 रुपये होईल. उत्पादन खर्च वाढल्याने ही वाढ होणार आहे. मात्र, दोन रुपयात मिळणार्‍या पेटीत 36 ऐवजी 50 काड्या (Matchsticks) असतील.

 

– SBI क्रेडिट कार्डद्वारे EMI ट्रांजक्शन महागणार
एसबीआय क्रेडिट कार्ड (SBI Credit Card) द्वारे ईएमआय ट्रांजक्शनसाठी 99 रुपये प्रोसेसिंग फी आणि त्यावर टॅक्स चुकवावा लागेल. हा नवीन नियम 1 डिसेंबरपासून लागू होईल. एसबीआय कार्ड अँड पेमेंट सर्व्हिसेस प्रा. लि. (SBICPSL) ने ही घोषणा केली आहे.

– PNB ग्राहकांना झटका
पंजाब नॅशनल बँकेने (Punjab National Bank- PNB) आपल्या खातेधारकांना मोठा झटका देण्याची तयारी केली आहे. बँक 1 डिसेंबर 2021 पासून सेव्हिंग अकाऊंटमध्ये जमावर व्याजदर कमी करणार आहे. हा दर वार्षिक 2.90 टक्केवरून कमी करून 2.80 टक्के करणार आहे. 1 सप्टेंबर 2021 ला सुद्धा व्याजदरात बँकेने कपात केली होती.

– LPG च्या किमतीत बदल
डिसेंबर महिन्यात एलपीजी गॅसच्या किमतीत सुद्धा बदल होऊ शकतो. 1 डिसेंबरला पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात एलपीजीचे दर वाढू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

Web Title :- Money | from matchbox to credit card things to get costlier from december 1

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

ATM Rule Change | मोठी बातमी ! ATM मधून कॅश काढण्याचे बदलले नियम, जाणून घ्या अन्यथा अडकतील पैसे

Indian Railway | देशात पहिल्यांदा मातीच्या डोंगराखाली रेल्वे बनवत आहे सर्वात मोठा बोगदा, जाणून घ्या कुठे?

NCP MLA Babajani Durrani | आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी राष्ट्रवादी सोडल्याच्या चर्चेला सोशल मीडियावर उधान; उधाण, प्रचंड खळबळ