सावधान ! 15 डिसेंबरपासून बँकेचा नियम बदलणार, जाणून घ्या अन्यथा द्यावे लागतील अगाऊ चार्जेस
मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – 15 डिसेंबरपासून बचत खाते आणि एटीएम सेवेसाठी बँकेकडून जास्त पैसे आकारले जाणार आहेत. म्हणजेच बँक लवकरच जुन्या नियमांमध्ये बदल करून नवीन नियम लागू करणार आहेत. जर ICICI बँकेचे तुम्ही खाते धारक असाल तर पुढील माहिती तुमच्यासाठी खूप महत्वाची आहे. कारण जर बदललेले नियम तुम्हाला माहित नसतील तर तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते. बचत खात्यात पैसे भरणं, आणि पैसे काढण्यासाठी आतापर्यंत कोणतेही शुल्क आकारले जात नव्हते.
मात्र आता बँकेचे नियम बदलण्यात आले असून याबाबत शुल्क आकारला जाणार आहे. त्यामुळे बदलेल्या नियमांची माहिती नसल्यास तुम्हाला भुर्दंड भरावा लागू शकतो तसेच एटीएममधून केल्या जाणाऱ्या ट्रान्झाक्शनवरही किरकोळ दंड आकारण्यात येत होता. याबाबतची माहिती सध्या आयसीआयसीआय बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
ICICI बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ATM बाबतचे नियम देखील बदलणार
एटीएम बाबतच्या व्यवहारांवर देखील आता निर्बंध लावण्यात येणार आहेत. त्यासाठी ICICI बँकेने बचत खात्यासोबत आता ATM बाबतचे नियम देखील बदलण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीनुसार एका महिन्यात 5 ट्रान्झाक्शन विनाशुल्क असतील. त्यानंतर प्रत्येक व्यवहारासाठी तुम्हाला 20 रुपये आकारण्यात येणार आहेत.
कॅश व्यवहारासाठी किती असेल शुल्क
होम ब्रांच नसल्यास तुमच्या खात्यातून तुम्ही 25 हजार रुपयांपर्यंत ट्रान्झाक्शन करू शकता. 25 हजार रुपयांपर्यंत केलेले कोणतेही व्यवहार हे विनाशुल्क असतील मात्र त्यानंतर हजार रुपयांमागे 5 रुपये आणि मिनिमम शुल्क 150 असे अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
2 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ग्राहक आपल्या खात्यामध्ये भरू शकतो किंवा काढू शकतो मात्र त्यापेक्षा अधिक रक्कम असल्यास प्रत्येकी 1000 रुपयांमागे 5 रुपये असा कमीतकमी शुल्क आकारला जाणार आहे.
ग्राहक आपल्या बचत खात्यामाध्ये महिन्यातून चार वेळा पैसे भरू शकतो आणि काढू शकतो त्यानंतर होणाऱ्या पाचव्या व्यवहारापासून तुम्हाला 150 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे.
थर्ड पार्टी कॅश ट्रान्झाक्शन
या व्यवहारांसाठी तुम्हाला बँकेतून प्रत्येक दिवशी 25 हजार रुपयांपर्यंत देवाण घेवाण करता येणार आहे. मात्र त्यावर 150 रुपये अतिरिक्त शुल्क आकारण्यात येणार आहे. थर्ड पार्टी कॅश ट्रान्झाक्शनसाठी 25 हजारांपेक्षा अधिक व्यवहाराला बँकेकडून परवानगी देण्यात येणार नाही.
Visit : Policenama.com
- गुळ खाल्ल्याने पिंपल्स होतील दूर, ‘हे’ आहेत ६ आरोग्यदायी फायदे !
- अशी थांबवा केसगळती ! ‘या’ ६ उपयांपैकी करा एक उपाय, जाणून घ्या
- कोमल, तजेलदार, त्वचेसाठी नियमित खा फळे, जाणून घ्या १० फायदे
- ‘या’ ३ आजारांवर शेपूची भाजी गुणकारी, आरोग्य राहील चांगले
- दही-भाताचे सेवन केल्यास होतील ‘हे’ १० आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- तरूण दिसण्यासाठी ‘हे’ ७ पदार्थ आवश्य सेवन करा, जाणून घ्या
- साधे, गरम आणि मिठाचे पाणी पिण्याचे ‘हे’ आहेत १३ आरोग्यदायी फायदे