Money Laundering Case | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे तत्कालीन खाजगी सचिव संजीव पलांडे यांचे निलंबन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Money Laundering Case | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांचे तत्कालीन खाजगी सचिव आणि अपर जिल्हाधिकारी संजीव पलांडे (private secretary sanjeev palande) यांचे निलंबन (suspend) करण्यात आले आहे. मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) त्यांची चौकशी सुरु असल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने (ED) त्यांना 26 जूनला अटक केल्यानंतर 6 जुलैपर्यंत ईडीच्या कोठडीत होते. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial custody) मंजूर करण्यात आली. त्यांचा पोलीस कोठडीतील (Police custody) कालावधी 48 तसांपेक्षा अधिक असल्याने 26 जूनपासून त्यांना निलंबित मानण्यात आलं आहे. तसेच पुढील आदेश येईपर्यंत ते निलंबित राहतील असं स्पष्ट करण्यात आले आहे.

निलंबनाच्या कालावधीत संजीव पलांडे यांनी खासगी नोकरी किंवा धंदा करु नये असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. तसे केल्यास निलंबन निर्वाह भत्ता गमविण्यास पात्र ठरतील असेही सांगण्यात आले आहेत. याशिवाय खाजगी नोकरी (Private job) किंवा धंदा करत नसल्याचं प्रमाणपत्र द्याव लागणार आहे.

दुसरीकडे, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी ईडीने बजावलेल्या समन्सविरोधात माजी गृहमंत्री अनिल देशमुख
यांनी केलेल्या याचिकांची सुनावणी एकलपीठ नव्हे तर खंडपीठासमोरच व्हायला हवी असा निर्वाळा उच्च न्यायालयाने (High Court) मंगळवारी दिला.
याशिवाय देशमुख यांची याचिका योग्य त्या खंडपीठासमोर सुनावणीसाठी सादर करण्याचे आदेशही न्यायालयाने  निबंधक कार्यालयाला दिले.

Web Titel :- Money Laundering Case | anil deshmukh private secretary sanjeev palande suspended

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | ‘आला रे आला, तुमचा बाप आला’ गजा मारणेच्या रॅलीचा व्हिडिओ व्हायरल करणऱ्यावर MPDA कारवाई

Pune Honeytrap Case | पुण्यातील भाजी विक्रेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून केली खंडणीची मागणी; तोतया पत्रकारासह टोळी गजाआड, सापडले CBI चे बनावट ओळखपत्र

Gold Price Today | 46 हजारच्या खाली गेले सोने, चांदीत 724 रुपयांची घसरण; जाणून घ्या नवीन दर