Money Laundering Case | अनिल देशमुख यांच्यासह 2 सचिव अन् सचिन वाझे केंद्राच्या ताब्यात; CBI चे पथक कारागृहात दाखल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्यासह त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे (Secretary Sanjeev Palande), आणि स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे (Kundan Shinde) यांना ताब्यात घेण्यासाठी केंद्रीय अन्वेषण ब्यूरोचे (CBI) अधिकारी आर्थर रोड तुरुंगात (Arthur Road Prison) पोहचले आहेत. दरम्यान मनी लॉन्ड्रिंग प्रकरणातील (Money Laundering Case) मुंबईचे बडतर्फ पोलीस (Mumbai Police) अधिकारी सचिन वाझेला (Sachin Vaze) ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे दुसरे पथक तळोजा कारागृहात (Taloja Jail) पोहोचले आहे. आजपासून या चौघांचा ताबा सीबीआयकडे असणार आहे.

 

पीएमएलए कोर्टाने (PMLA Court) आर्थर रोड कारागृह अधीक्षकांना अनिल देशमुख, पलांडे आणि शिदे यांचा ताबा सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले.
याशिवाय एनआयए कोर्टाने (NIA Court) नवी मुंबईतील तळोजा कारागृहाच्या अधीक्षकांनाही (Prison Superintendent) सचिन वाझेला सीबीआयकडे सोपवण्याचे निर्देश दिले होते.
चौघांना केंद्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात देण्यासाठी कागदोपत्री काम सुरु असल्याच्या वृत्ताला कारागृहातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे.

 

दरम्यान, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) अटकेत असलेले राष्ट्रवादीचे (NCP) नेते अनिल देशमुख यांच्याविरोधातील सीबीआय चौकशी विशेष तपास पथकाकडे (Special Investigation Team) हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका राज्य सरकारने (State Government) सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) दाखल केली होती.
या याचिकेत सरकारने विद्यमान सीबीआय संचालकच (CBI Director) महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि नियुक्त्यांना कारणीभूत असल्याचा युक्तिवाद केला.
परंतु सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी महाविकास आघाडी सरकारची (Mahavikas Aghadi Government) ही याचिका फेटाळली.
तसेच देशमुख आणि सचिन वाझे यांचा सीबीआयकडे देण्यास मुंबईतील विशेष न्यायालयाला परवानगी दिली.

अँटिलिया स्फोटक प्रकरणातील (Antilia Blast Case) कारचे मालक मनसुख हिरेन हत्या प्रकरणी (Mansukh Hiren Murder Case) एनआयएने सचिन वाझेला 13 मार्च 2021 ला अटक (Arrest) केली होती.
तसेच ईडीने (ED) शंभर कोटी वसुली प्रकरणी अनिल देशमुखांना अटक केली होती.
याप्रकरणी त्यांच्या दोन स्वीय्य सहाय्यकांना देखील अटक केली होती. सीबीआयने चौघांनाही अटक करण्यासाठी वॉरंट मिळवले होते.
त्या आधारावर एजन्सीने शुक्रवारी विशेष पीएमएलए न्यायालय आणि विशेष एनआयए न्यायालयात धाव घेऊन 21 एप्रिल 2021 रोजी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध नोंदवलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात त्यांना अटक करण्याची परवानगी मागितली.
त्यानुसार न्यायालयाने सीबीआयला चौघांचा ताबा घेण्याची परवानगी दिली.

 

Web Title :- Money Laundering Case | central bureau of investigation (cbi) team to take custody of anil deshmukh his secretary and sachin vaze

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा