Money Laundering Case | ‘राष्ट्रवादी’ला ED चा आणखी एक दणका, राज्यमंत्र्याची 13 कोटींची संपत्ती जप्त

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मनी लॉन्ड्रिंग प्रकरणाच्या (Money Laundering Case) आरोपाखाली राष्ट्रवादीचे नेते (NCP) आणि मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांना ईडीने (ED) अटक (Arrest) केली आहे. त्यापाठोपाठ आता आणखी एका महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) मंत्र्यावर ईडीने कारवाई केली आहे. राम गणेश गडकरी साखर कारखाना (Ram Ganesh Gadkari Sugar Factory) व्यवहार प्रकरणी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांची ईडीने 13 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. प्राजक्त तनपुरे यांची साखर कारखाना आर्थिक घोटाळा प्रकरणी काही दिवसांपूर्वी ईडीने चौकशी केली होती. (Money Laundering Case)

 

ईडीने ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची जवळपास 13.41 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. ईडीने तनपुरे यांच्या दोन जमिनीही जप्त केल्या आहेत. त्या जागांची किंमत जवळपास 7 कोटी 60 लाख एवढी आहे. त्यामुळे अनिल देशमुख (Anil Deshmukh), नवाब मलिक यांच्यानंतर राष्ट्रवादीचा तिसरा मंत्री ईडीच्या निशाण्यावर असल्याचे समोर आले आहे. (Money Laundering Case)

प्राजक्त तनपुरे यांनी महाराष्ट्र स्टेट को – ऑपरेटिव्ह बँक (Maharashtra State Co – operative Bank) यांच्या लिलावात (Auction) एक साखर कारखाना अतिशय कमी किंमतीत विकत घेतल्याचा आरोप आहे. ईडीने तनपुरे यांच्या साखर कारखान्याबाबत चौकशी सुरु केली होती. त्यानंतर मागील वर्षी डिसेंबरमध्ये त्यांचा जबाब नोंदवण्यात आला. हा तपास सुरु असताना आता ईडीने तनपुरे यांच्यावर पीएमएलएनुसार (PMLA) कारवाई करत मालमत्ता जप्त (Property Seized) केली आहे.

काय आहे प्रकरण ?
2012 साली अहमदनगरच्या (Ahmednagar) राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरे यांनी विकत घेतला. कारखान्याची 26 कोटी मूळ किंमत होती. मात्र, हा कारखाना तनपुरे यांच्या कंपनीने 12 कोटीत विकत घेतला होता. या कारखान्याला महाराष्ट्र बँकेचं (Bank of Maharashtra) कर्ज होतं. या व्यवहारात मोठा घोटाळा झाल्याचा संशय ईडीला आहे. त्यामुळे ईडीने तनपुरे यांना 7 डिसेंबर 2021 रोजी समन्स बजावलं होतं. त्यानंतर त्याच दिवशी तनपुरे यांची 10 तासापेक्षा जास्त वेळ चौकशी करण्यात आली.

 

सरकामधील 12 पेक्षा जास्त मंत्री ED च्या रडारवर
राज्य सरकारमधील 12 पेक्षा जास्त मंत्र्यांच्या मागे ईडीच्या चौकशीचा ससेमिरा लागला आहे.
त्यामुळे पुन्हा चर्चांना उधाण आलं आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गेल्या आठवड्यात नवाब मलिक यांना अटक केली आहे.
तर अनिल देशमुख काही महिन्यापासून अटकेत आहेत. अनिल परब (Anil Parab), एकनाथ खडसे (Eknath Khasde), अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) अशा अनेक नेत्यांमध्ये सध्या ईडीच्या चौकशीचा फेरा सुरु आहे.
त्यातच आज प्राजक्त तनपुरे यांची भर पडली आहे.
त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.

 

Web Title :- Money Laundering Case | ed attaches assets maharashtra minister prajakt tanpure ram ganesh gadkari sahkari sakhar karkhana ssk case

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा