Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात राज्य गृह विभागाचे उपसचिव कैलास गायकवाड यांना ईडीचं समन्स

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Money Laundering Case | माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Former Home Minister Anil Deshmukh) यांच्याशी संबंधित कथित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) राज्याच्या गृहविभागाचे उपसचिव कैलास गायकवाड (Deputy Secretary Kailas Gaikwad) यांना ईडीने समन्स बजावले आहे. त्यांना चौकशीसाठी आज हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात ANI या न्यूज एजन्सीने ट्विट केलं आहे.

दरम्यान, उपसचिव कैलास गायकवाड यांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. अनिल देशमुख हे आतापर्यंत ईडीच्या चौकशीला हजर राहिले नाही. ईडीने त्यांना अनेकदा समन्स बजावले. मात्र ते एकदाही हजर राहिले नाही. त्यामुळे कैलास गायकवाड हेही ईडी (ED) चौकशीला उपस्थित राहणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (former mumbai police commissioner param bir singh) यांनी १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केला (Money Laundering Case) होता. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री यांना दिले होते. बार मालकांकडून दरमहा १०० कोटी रुपये वसूल करण्याचे आदेश सचिन वाझेला दिल्याचं परमबीर यांनी पत्रात म्हटलं होतं. त्यानंतर गृहमंत्री पदाचा अनिल देशमुख यांना राजीनामा ही द्यावा लागला होता. तसेच पीएमएलए कायद्याच्या (PMLA Act) अंतर्गत ईडीकडून तपास सुरू आहे.

Aadhaar Card | ‘आधार’शी संबंधित नियमांत मोठे बदल, जाणून घ्या फायदा होणार की नुकसान

अनिल देशमुखांच्या संबंधित मालमत्तांवर आयकर विभागाची धाड

सीबीआयने (CBI) पहिल्यांदा म्हणजे २५ मार्चला अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील घरी छापा टाकला होता त्यांनतर २४ एप्रिलला ईडीकडून छापेमारी झाली. पुन्हा ईडीने १६ मे, २६ मे तसेच १६ जुलै आणि ६ ऑगस्टला कारवी केली होती.
त्यानंतर आयकर विभागाने (Income Tax Department) ही धाडसत्र राबवले.
अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर १७ आणि १८ सप्टेंबर रोजी आयकर विभागाने धाड टाकली होती.
यावेळी नागपुरातील (Nagpur) साई शिक्षण संस्थेच्या (sai education society) कार्यालयाची झाडाझडती घेतली.

कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीने दोन महिन्यांपूर्वी अनिल देशमुख यांची चार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या कारवाईत देशमुखांची स्थावर मालमत्ता जप्त केली आहे.
त्यामुळे ईडीने त्यांना मोठा झटका दिल्याचे मानले जात आहे.

हे देखील वाचा

Petrol Diesel Price | दोन दिवसात पेट्रोल प्रति लिटर 42 पैशांनी तर डिझेल 57 पैशांनी महागले

Pune Crime | पुण्याच्या कात्रज परिसरात डोक्यात वीट पडून महिलेचा मृत्यु

Earn Money | लवकर सुरू करा ‘हे’ काम, रोज होईल 3000 रुपयांची कमाई; जाणून घ्या सोपी पद्धत

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Money Laundering Case | ed summons maharashtra deputy home secretary kailas gaikwad in money laundering case after anil deshmukh

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update