Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही अन् जॅकलिनला लक्झरी कार भेट दिल्याचा ED ला दाट संशय

पोलीसनामा ऑनलाइन – Money Laundering Case | सुकेश चंद्रशेखर (sukesh chandrasekhar) मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) ईडीकडून (ED) कसून चौकशी सुरु आहे. या प्रकरणामध्ये रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. तपासादरम्यान सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री आणि डान्सर नोरा फतेही (nora fatehi) आणि जॅकलिन फर्नांडिसला (jacqueline fernandez) एक मोठी लक्झरी कार गिफ्ट केल्याची माहिती समोर आली आहे. त्या अनुषंगाने ईडीने या दोन्ही अभिनेत्रींनकडे तासन्तास चौकशी केली आहे. इतकेच नाही तर या दोन्ही अभिनेत्रींना बंगले गिफ्ट करण्याची तयारीही केली जात होती, असेही समोर आले आहे.

Benefits Of Exercise | अकाली वृद्धत्व आणि हृदय कमजोर होणं, एक्सरसाईज न केल्याने ‘या’ 6 प्रकारे होते शरीराचे गंभीर नुकसान; जाणून घ्या

सुकेश चंद्रशेखरने अभिनेत्री नोरा फतेहीला बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. मुंबईतील शोरूममधून नोरा कार घेऊन जात असल्याचे व्हिज्युअल्सही समोर आले होते असे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. सात ऑक्टोबरला ईडीने नोरा फतेहीचा जबाब नोंदवला. त्यावेळी कार भेट दिल्याची माहिती समोर आली. व्यावसायिकाच्या पत्नीला धमकावून जी रक्कम सुकेशने घेतली होती. त्या रक्कमेतून एक कोटीहून अधिक किमतीची कार नोराला भेट म्हणून दिली आहे. त्यानंतर ईडीने नोरा आणि सुकेश यांना समोरासमोर बसवून काही प्रश्न विचारले. चौकशीवेळी नोराने सांगितले की, २०२० मध्ये चेन्नईला एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात नोराही उपस्थित होती. त्या कार्यक्रमात त्याला सुकेशची पत्नी आणि अभिनेत्री लीना पॉलने बोलावले होते. त्यामुळे आता या भेटीची आणि ती कार कोणत्या पैशाने खरेदी (Money Laundering Case) केली गेली याचीही चौकशी ईडीने सुरु केली आहे.

जॅकलिनचीही ईडीने चौकशी केली आहे. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली.
जॅकलीनशी बोलताना सुकेशने आपली ओळख लपवली होती. दरम्यान दोन्ही अभिनेत्री आपण निर्दोष असल्याचे म्हणत आहे. त्यांच्या मते, या वसुली रॅकेट बद्दल त्यांना काही माहिती नव्हते. मात्र ईडीने या दोघींमार्फत अनेक महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे.

हे देखील वाचा

Pune News | ‘सगळे चोर आहेत त्यांना शासन झालंच पाहिजे’, राजू शेट्टींचा सर्वपक्षीय कारखानदारांवर निशाणा

Ratan Tata-Rakesh Jhunjhunwala | रतन टाटांच्या ‘या’ 2 कंपन्यांनी राकेश झुनझुनवाला यांना करून दिली सर्वात जास्त कमाई, जाणून घ्या यावर्षी किती दिला रिटर्न

Pune News | पुण्यात अजित पवारांच्या उपस्थितीत बालगंधर्वमध्ये वाजली तिसरी घंटा; कितीवेळा वाजवायची कोणाला माहिती… (व्हिडीओ)

ट्विटर ला देखील फॉलो करा

फेसबुक ला लाईक करा

Web Titel :  Money Laundering Case | ed suspects sukesh chandrasekhar gifted luxury car to nora fatehi and jacqueline fernandez

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update