Money Laundering Case | मनी लॉन्ड्रिंग प्रकरण ; National Herald सहित 12 ठिकाणांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Money Laundering Case | ईडीने (ED) दिल्लीतील National Herald च्या कार्यालयावर छापा मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहूल गांधी (Rahul Gandhi) यांच्या चौकशीनंतर ही कारवाई करण्यात आली आहे. (Money Laundering Case)

 

मिळालेल्या माहितीनूसार, National Herald प्रकरणात ईडीने दिल्ली (Delhi) आणि कोलकता (Kolkata) सहित 12 ठिकाणांवर छापे मारले आहेत. यात दिल्लीतील National Herald च्या कार्यालयाचा देखील समावेश आहे. मंगळवारी सकाळी दहा वाजता ईडीचे अधिकारी कार्यालयात पोहचले. त्यांनी National Herald च्या पब्लिकेशन कार्यालयाची झाडाझडती घेतली. त्यावेळी कार्यालयात सुरक्षा रक्षकाशिवाय अन्य कोणीही उपस्थित नव्हते.

 

या प्रकरणात ईडीने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांची नुकतीच चौकशी केली होती. त्यानंतर काँग्रेसने संपूर्ण देशात ईडी विरोधात आंदोलन केले होते. मंगळवारी केलेल्या कारवाई बाबत पक्षाचे खासदार उत्तर रेड्डी यांनी म्हटले आहे की, हे सर्व राजकीय बदला घेण्यासाठी केले जात आहे. दुसरे काहीच नाही. (Money Laundering Case)

 

नेमके काय आहे प्रकरण ?

नॅशनल हेराल्ड वर्तमान पत्र जवाहरलाल नेहरू (Jawaharlal Nehru) यांनी 500 स्वातंत्र्य सैनिकांबरोबर सुरू केले होते.
त्यात ब्रिटिशांच्या अन्यायाबद्दल लिहिले जात होते. हे वर्तमान पत्र Associated Journals Limited या पब्लिशर कडून प्रसिध्द केले जात होते.
सन 1960 मध्ये हे पब्लिशर आर्थिक संकटात सापडले. त्यावेळेस काँग्रेस पार्टीने त्यांना विना व्याज कर्ज (Loan) दिले.
नंतर सन 2008 मध्ये पब्लिशरने वर्तमान पत्र प्रसिध्द करायचे काम थांबवले.
सन 2010 मध्ये उघडकीस आले की, पब्लिशर काँग्रेस पार्टीचे 90.21 कोटी रुपये कर्ज देणे आहे.
सन 2010 मध्ये Young Indian Private Limited नावाची कंपनी उदयास आली जी नॉन प्रॉफिट कंपनी म्हणून रजिस्टर करण्यात आली.
या कंपनीत राहूल गांधी यांना डायरेक्टर केले गेले आणि काही दिवसातच सगळे कर्ज या कंपनीकडे वर्ग करण्यात आले. सन 2011 मध्ये सोनिया गांधी या कंपनीच्या डायरेक्टर झाल्या. अशाप्रकारे कंपनीचे 36 टक्के शेअर त्यांच्या नियंत्रणात आले. त्यानंतर कंपनीने कोलकताच्या एका कंपनीकडून 1 कोटी रुपये कर्ज घेतले. ही कंपनी बनावट असल्याचे सांगितले गेले. अशाप्रकारे आर्थिक अनियमितता समोर आल्याने सोनिया गांधी आणि राहूल गांधी यांच्यामागे चौकशीचा ससेमिरा लागला.

 

Web Title : –  Money Laundering Case | money laundering case ED raids 12 places including National Herald

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा