Money Laundering Case | ‘हवाला’च्या माध्यमातून हाँगकाँगला पाठविले तब्बल 1100 काेटी रुपये; CA ला अटक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Money Laundering Case | हवालाच्या माध्यमातून हाँगकाँगला (Hong Kong) 1100 काेटी रुपये पाठविल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) एका CA ला अटक करण्यात आली आहे. रवी कुमार (रा. दिल्ली) असं त्या सीएचं नाव आहे. तर, मुंबईमधून एसबीआय (SBI) आणि अन्य बँकांद्वारे बनावट बिल आणि क्लाउड CCTV स्टाेरेजचे बाेगस दर दाखवून हा गैरव्यवहार (Money Laundering Case) केल्याचा आराेप (Hawala) त्याच्यावर ठेवला गेला आहे.

 

लिंक्यून टेक्नाॅलाॅजिस, डाेकीपे टेक्नाॅलाॅजी अशा काही चिनी कंपन्यांविरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money Laundering Case) ईडी (ED) तपास करत आहे. संबधित कंपन्यानी अनेक अशा वापरकर्त्याची बेकायदेशीर गेमिंग, ऑनलाइन सट्टा, डेटिंग तसेच स्ट्रिमिंग ॲपद्वारे कोट्यावधी रुपयांची फसवणूक केलीय. तसेच, हा पैसा ऑनलाइन पेमेंट गेटवेच्या माध्यमातून जमा केला गेला आहे. दरम्यान, यानंतर हवालाच्या माध्यमातून क्रिप्टाेकरन्सीची खरेदी, केसांचे व्यापारी तसेच बेकायदेशीर मार्गाने सिंगापूरला पैसे रवाना करुन मनी लाँड्रिंग (Money Laundering Case) करण्यात आले आहे.

दरम्यान, बोगस एअरवे बिले दाखवून विविध बँकांद्वारे बनावट परकीय पेमेंट दाखविण्यात आले आहे.
यासाठी सीसीटीव्हीचे क्लाउड स्टाेरेजसाठी बनावट पावत्याही दाखविले होते.
सीए रवी कुमारने अशा 621 बाेगस प्रमाणपत्रे आणि शेल कंपन्यांच्या लेंस शीटवर स्वाक्षऱ्या केल्या हाेत्या.
त्यामधील माहितीची पडताळणी त्याने केली नव्हती.
तर, यामुळे शेकडाे काेटी रुपये हाॅंगकाॅंग (Hong Kong) येथे पाठवण्यात आराेपींना मदत केली असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
असा ईडीने (ED) खुलासा केला आहे.

 

या दरम्यान, हरयाणातील हिसार मधील प्रकाश इंडस्ट्रीजची सुमारे 228 काेटी रुपयांची मालमत्ता सक्तवसुली संचालनालयाकडून (ED) जप्त करण्यात आले आहे.
तसेच, हरयाणासह दिल्ली, नाेयडा आणि छत्तीसगड येथील मालमत्तांचा त्यात समावेश आहे.
काेल ब्लाॅक वाटपात मनी लाँड्रिंग प्रकरणी (Money laundering) ही कारवाई केली गेली आहे.

 

Web Title :- Money Laundering Case | rs 1100 crore sent hong kong through hawala ca arrested ed transactions done through banks

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Omicron Covid Variant | 5 वर्षांपेक्षा लहान मुलांना टार्गेट करतोय ‘ओमिक्रॉन व्हेरिएंट’; डॉक्‍टरांचा दावा

Amitabh Bachchan | चित्रपटांमध्ये काम मिळत नव्हतं, KBC च्या सेटवर भावूक झाले ‘बिग बी’ अमिताभ, व्हिडीओ पाहून तुमच्या देखील डोळयात पाणी…

खुलेआम सुरू आहे बनावट Aadhaar Card बनवण्याच धंदा, 10 मिनिटात तयार करतात कॉपी; असे ओळखा बनावट आणि खरे