पर्सलन लोन घेताना ध्यानात ठेवा ‘या’ गोष्टी अन्यथा द्यावं लागेल जास्तीचं व्याज

मुंबई : पोलिसनामा ऑनलाइन – कर्ज देणारा अनेकदा ग्राहकाच्या सर्व गोष्टी तपासून पाहतो मात्र कर्ज घेणारा स्वतःची अडचण आणि गरज सोडून इतर गोष्टी बारकाईने तपासून पाहत नाही. कमी व्याज दरात पर्सनल लोन घ्यायचे असेल तर काही गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे.

व्याजाचा दर इतर ठिकाणीही तपासा आणि पूर्ण माहिती घ्या
अनेक ठिकाणी व्याजाचा दर वेगळा वेगळा असतो. पर्सनल लोन घेताना अनेक वेगवेगळ्या ऑफर दिल्या जातात. त्यामुळे ऑनलाइन पद्धतीने अनेक ठिकाणचा व्याजदर तपासून पाहणे खूप महत्वाचे आहे.व्याजाच्या कॅल्क्युलेशनची पूर्ण आकडेमोड नीट करून पहा जेणेकरून तुम्हाला नंतर असे वाटणार नाही की तुम्ही जास्त व्याज दिले आहे.

चांगला क्रेडिट स्कोअर ठेवा
तुम्ही योग्य वेळी कर्ज फेडलंत तर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला राहतो. 750 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर असणं चांगलं मानलं जातं. तुम्ही कर्ज फेडण्यासाठी उशीर केलात तर तुमच्या क्रेडिट स्कोअरवर परिणाम पडतो. त्यामुळे क्रेडिट स्कोर मेंटेन ठेवणे महत्वाचे आहे.

पेमेंट क्लिअर, हिस्ट्री चांगली ठेवा
तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डाचं बिल योग्य वेळी जमा करा. दर महिन्याला कर्ज क्लियर ठेवा. तुम्हाला कर्जाचा EMI वेळेवर जमा करायला पाहिजे. तुमचं EMI पेमेंट नियमित दर महिन्याला करा. तुमची EMI पेमेंट हिस्ट्री चांगली असायला हवी. म्हणजे तुम्ही कमी व्याजाची मागणी करू शकता आणि हिस्ट्री चांगली असेल तर सिव्हिल स्कोर चांगला राहतो त्यामुळे कर्ज लवकर मिळते म्हणून या गोष्टी मेंटेन ठेवणे गरजेचे आहे.

नोकरी करत असलेल्या कंपनीचाही परिणाम
तुम्ही एखाद्या मोठ्या कंपनीत काम करत असाल तर पर्सनल लोन घेताना चांगलं डिल होऊ शकतं. कारण कर्ज देणारा हे बघतो की तुम्ही ज्या कंपनीत काम करता तिथून तुम्हाला नियमित पगार मिळतोय. चांगल्या कंपनीत कामाची शाश्वती कर्ज देणाऱ्याला झाली तर लवकर कर्ज मंजूर होते.

You might also like