‘हा’ आहे पैशाला दुप्पट-तिप्पट करण्याचा ‘फॉर्म्युला’, जाणून घेऊन तुम्ही देखील होऊ शकता ‘श्रीमंत’

नवीदिल्ली : वृत्तसंथा – गुंतवणूक करण्याआधी सगळ्यांना हे जाणून घेण्यात खूप इच्छा असते की आपले पैसे दुपट्ट तीपट्ट कधी होणार. मात्र याबाबतच्या संपूर्ण नियमांची माहिती लोक स्वतः करून घेत नाहीत. त्यामुळे गुंतवणूक करताना त्या बाबतच्या नियमांची माहिती करून घेणे खूप गरजेचे आहे. आज आम्ही तुम्हाला काही सोपे नियम सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला समजेल की कोठे गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

काय आहे नियम 72 – तुमची गुंतवणूक डबल कधी होणार याचा एक सर्वसामान्य नियम सर्वांना माहिती आहे. हा नियम 72 आहे या नियमानुसार तुमचे पैसे कधीपर्यंत दुपट्ट होतील याची माहिती तुम्हाला मिळते. जाणून घेऊयात याचा फॉर्म्युला

उदा – समजा तुम्ही एसबीआयच्या एखाद्या स्कीम = मध्ये गुंतवणूक केलेली आहे. यामध्ये तुम्हाला वार्षिक 7 % व्याज मिळत आहे. अशात जर नियम 72 प्रमाणे तुम्ही 72 ला 7 ने भागले तर 72/7= 10.28 वर्ष. म्हणजेच या योजनेमध्ये तुमचे पैसे 10.28 वर्षात दुपट्ट होणार.

किती वर्षात तीपट्ट होणार गुंतवणूक
नियम 114 – या नियमाच्या माध्यमातून तुम्हाला समजू शकते की तुमचे पैसे तीपट्ट कधी होणार. यासाठी तुम्हाला 114 ला तुमच्या व्याजदराने भागावे लागेल.

उदा – तुम्ही ज्या योजनेमध्ये गुंतवणूक केलेली आहे त्यामध्ये जर आठ टक्के वार्षिक व्याजदर असेल तर 114 ला 8 ने भागावे लागेल. 114/8= 14.25 वर्ष. म्हणजेच या योजनेनुसार 114/8= 14.25 वर्षात तुमचे पैसे तीपट्ट होणार.

किती वर्षात होणार चौपट पैसा
नियम 144 – तुमचा पैसे चौपट कसा होईल या बाबतची माहिती हा नियम देतो.
उदा – जर तुम्ही 8 % या वार्षिक व्याजदराने गुंतवणूक केलेली आहे. तर 144/8= 18 वर्षे , सूत्रानुसार 18 वर्षात तुमचे पैसे चौपट होतील.

Visit : Policenama.com