नवी दिल्ली : Money Making Tips | सध्या अशा अनेक सरकारी बचत योजना (Govt Savings Schemes) आहेत ज्या गुंतवणूकदारांना सुरक्षित आणि खात्रीशीर रिटर्न देतात. जर तुम्ही पैसे गुंतवण्यासाठी चांगली योजना शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. येथे आम्ही तुम्हाला काही सरकारी बचत योजनांबद्दल सांगत आहोत ज्या तुम्हाला अधिक फायदे देतात. या योजनांमध्ये सर्व वर्गांसाठी गुंतवणुकीचे पर्याय उपलब्ध आहेत. या योजना तुमच्या भविष्यासाठी पैशांची बचत करण्यात उपयोगी ठरू शकतात. (Money Making Tips)
यापैकी काही बचत योजनांवर, सरकार कर सवलत देते. कर वाचवू पाहणाऱ्या लोकांसाठी एक आकर्षक गुंतवणूक आहे. याशिवाय या बचत योजना सरकारला विविध विकास प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मदत करतात. (Money Making Tips)
1. नॅशनल सेव्हिंग्ज सर्टिफिकेट National Savings Certificate (NSC)
राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र ही भारत सरकारची कर बचत गुंतवणूक योजना आहे. तुम्ही ती कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून खरेदी करू शकता. सरकारी समर्थनामुळे यामध्ये हमखास रिटर्न मिळतो आणि जोखीमही कमी असते. म्हणूनच गुंतवणुकीत जोखीम न घेणार्या लोकांना ती खूप आवडते. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा व्याज दर अर्थ मंत्रालयाकडून दर तिमाहीत निश्चित केला जातो. सध्या त्याचा व्याजदर 7.7 टक्के आहे. या योजनेअंतर्गत वार्षिक आधारावर व्याज जमा केले जाते.
2. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना Post Office Monthly Income Scheme (POMIS)
ही एक छोटी बचत योजना आहे ज्यामध्ये गुंतवणूक करून निश्चित मासिक उत्पन्न मिळवू शकता. यामध्ये किमान गुंतवणुकीची मर्यादा 1000 रुपये आहे. यामध्ये एका खात्यात जास्तीत जास्त 9 लाख रुपये आणि संयुक्त खात्यात १५ लाख रुपये जमा करता येऊ शकतात. योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 5 वर्षांचा आहे. हे खाते त्यात गुंतवणूक सुरू केल्यानंतर एक वर्षानंतर मुदतीपूर्वी बंद केले जाऊ शकते. परंतु 3 वर्षापूर्वी असे केल्यास, जमा रकमेतील 2 टक्के कपात केली जाते आणि त्यानंतर खाते बंद केल्यावर 1 टक्के कपात केली जाते. या अंतर्गत सध्या 7.4 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
3. सीनियर सिटीझन सेव्हिंग्ज स्कीम Senior Citizen Savings Scheme (SCSS)
सरकारचे समर्थन असलेली ही योजना 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी आहे. यामध्ये, खाते उघडल्याच्या तारखेपासून 5 वर्षांनी ठेवीची रक्कम मॅच्युअर होते, परंतु हा कालावधी एकदा 3 वर्षांसाठी वाढवता येतो. सेवानिवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्न मिळवून देणे हा या योजनेचा उद्देश आहे. या अंतर्गत, तुम्ही सार्वजनिक किंवा खाजगी क्षेत्रातील बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते उघडू शकता. सध्या 8.2 टक्के दराने व्याज दिले जात आहे.
4. महिला सन्मान सेव्हिंग्ज सर्टिफिकेट Mahila Samman Savings Certificate (MSSC)
केंद्र सरकारच्या लहान बचत योजनांप्रमाणेच ही वन टाइम सेव्हिंग स्कीम आहे.
या योजनेद्वारे २ वर्षांसाठी जमा केलेल्या रकमेवर 7.5 टक्के दराने व्याज दिले जाते.
महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजनेअंतर्गत, अर्ज करणाऱ्या महिलांना 2 लाख रुपयांच्या बचतीवर 7.5 टक्के
दराने व्याज मिळते. यामुळे महिलांना त्यांच्या पैशांची बचत करून भविष्यात स्वावलंबी होण्यास मदत होईल.
5. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड Public Provident Fund (PPF)
पब्लिक प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच PPF ही भारतातील सर्वात लोकप्रिय बचत योजनांपैकी एक आहे.
केंद्र सरकारचे समर्थन असल्यामुळे या योजनेत गुंतवलेले पैसे सुरक्षित असतात आणि परताव्याची हमी असते.
PPF योजनेचा उद्देश लहान गुंतवणूकदारांना लाभ देणे हा आहे.
यामध्ये किमान 500 रुपयांपासून गुंतवणूक सुरू करता येते.
यासोबतच यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना कर सवलतीही मिळतात.
PPF चा व्याजदर सरकार दर तिमाहीत ठरवते. 2023-24 च्या पहिल्या तिमाहीसाठी पीपीएफ व्याज दर 7.1% आहे.
Web Title :- Money Making Tips | top 5 savings schemes with govt guarantee know which one will give more security and return on your savings
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update