आर्थिक ‘विजय’ होईल की नाही म्हणून अनेक भक्‍त ‘कासावीस’ !

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड तालुक्यामध्ये सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहे. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेला बदल आणि स्वाभिमानाची जागृत होत असलेली लाट पाहून काही भक्त आपला आर्थिक ‛विजय’ होईल की नाही आणि त्यामुळे रखडलेली संधी आतूनतरी मिळेल की नाही याचा विचार करूनच हुडी-हुडी भरल्यासारखे वागू लागले आहेत.

सोशलवरील अनेकांच्या लिखाणाचा ताण काहींनी स्वतःच्या अंगावर अधिक ओढून घेतल्याने त्यांचे मानसिक संतुलन ढासळू लागल्याने स्वतःचे स्वयंघोषित ज्ञान कुठेही देऊ लागल्याने मोठ्या चर्चेचा विषय होऊ लागला आहे. स्वतःकडे उपलब्ध होईल त्या माध्यमांतून वाट्टेल ते लिहून आपली टिमकी मिरविण्यासाठी काही स्वयंघोषित तत्वज्ञानी बनले आहेत. सोशलवर कुणाच्याही पोस्टवर बिनबुलाये मेहमान बनून आपली अक्कल पाजळत असणाऱ्या लिखाण बहाद्दरांचाच प्रश्न ऐरणीवर आल्याने त्यांची भांबावल्यासारखी परिस्थिती झाली आहे.

एकाच बाजूने गाडा ओढण्यात तरबेज असणारे बहाद्दर या वेळी मात्र कुणीच त्यांना वाव देत नसल्याने ‛विजय’ कुणाचाही झाला तरी आपली आलेली आर्थिक संधी जाते की काय या धास्तीने सैरभैर झाल्याचे दिसत आहे. या मानसिकतेतूनच मग कुणाला वाट्टेल ते बोलून आणि हवे तसे लिहून स्वतःची असलेली पत ढासळून घेताना काही स्वयंघोषित विचारवंत दिसत आहेत.

जीवाचा आटापिटा करून मिळवलेली स्वंघोषित पदवी कुणीही आपल्याला विचारेणा या मानसिकतेतून वैफल्यग्रस्त होत जाऊन मग मला ‛पुढारी’ म्हणा ही मानसिकता तयार होऊ लागली आहे. परंतु आटा पिटा करूनही अशा बहद्दरांकडे कुणी लक्ष देत नसल्याने यापुढे आपला आर्थिक ‛विजय’ होईल की नाही या धास्तीने ते कासावीस होऊन वादग्रस्त लिखाण साम्राट झाल्याचे दिसत असून या परिस्थिती मुळे मात्र नागरिकांंची मोठी करमनुक होताना दिसत आहे.

Visit – policenama.com 

You might also like