‘३१ मार्च’ला अवघे ५ दिवस बाकी ; ही ‘५’ महत्त्वाची कामं पूर्ण करा

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – मार्च महिना आला की आर्थिक बाबी पूर्ण करण्याकडे सर्वांचे लक्ष लागते. यापैकी सर्वात महत्वाची बाब असते ती 31 मार्च पूर्वी आयकर भरण्याची. पण या वर्षी आयकर भारण्याव्यतिरिक्त आणखी काही बाबी देखील महत्वाच्या आहेत. या बाबी देखील 31 मार्च अखेर पूर्ण करणे अनिवार्य आहे. या पाच महत्वाच्या बाबी कोणत्या आहेत यावर एक नजर टाकूया.

१) आयटीआर रिटर्न फाईल करा :
जर तुम्ही 2017-2018 ची रिटर्न फाईल केली नसेल, तर कोणत्याही परिस्थितीत 31 मार्च 2019 पर्यंत हे काम पूर्ण करा. कारण उशिर झालास तुम्हाला 10 हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो. 5 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कमवणाऱ्या टॅक्स पेयर्ससाठी पेनल्टीची रक्कम ही फक्त 1 हजार रुपये आहे.

२) टॅक्स सूटसाठी गुंतवणुक करून घ्या :
आयकर विभागाच्या 80C टॅक्सची सूट हवी असेल, तर 31 मार्चपर्यंत गुंतवणूक करणे अनिवार्य आहे. जर तुम्ही ही गुंतवणूक आयकर विभागाला दाखवली, तर तुमचा टॅक्स वाचू शकतो. 80C नुसार एलआयसी, पीपीएफ, नॅशनल सिव्हिंग सर्टिफिकेट, पाच वर्ष एफडी, पेन्शन फंड, पोस्ट ऑफिस डिपॉझिट, सीनियर सिटीझन सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्यास तुमचा टॅक्स वाचू शकतो.

३) शेअर डीमॅटमध्ये कन्व्हर्ट करा :
तुमच्याकडे आताही फिजिकल फॉर्ममध्ये शेअर आहेत, तर त्याला 31 मार्च 2019 पर्यंत डीमॅटमध्ये कन्व्हर्ट करणे गरजेचे आहे. जर तुम्ही असे नाही केले, तर नियमानुसार शेअर वाचवणे शक्य नाही.

४) पॅनकार्ड-आधार लिंक करा :
पॅनकार्ड आधारला लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2019 आहे. जर तुम्ही पॅनकार्ड आधारकार्डसोबत लिंक केले नसेल, तर तुमचे पॅनकार्ड रद्द होऊ शकते.

५) टीव्ही चॅनल पॅकेज निवडा :
जर तुम्ही अजूनही टीव्ही चॅनेलचे पॅकेज निवडले नसेल, तर 31 मार्चनंतर तुमचा टीव्ही बंद होऊ शकतो. ट्राय (TRAI) ने केबल आणि डीटीएच ग्राकांसाठी 31 मार्च 2019 पर्यंत आपल्या आवडीचे चॅनल निवडण्यासाठी सांगितले होते.