आता घरातच लावा ATM आणि महिन्याला कमवा बक्कळ पैसा !

मुंबई : वृत्तसंस्था – जर तुमचं  घर, दुकान किंवा आॅफिस जर गर्दी असणाऱ्या ठिकाणी असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता  ATM घरी लावून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. पैसे काढण्यासाठी तुम्ही ATM चा वापर करत असाल. पण हेच ATM घरी लावून तुम्ही महिन्याला लाखो रुपयांची कमाई करू शकता. घरी ATM लावून पैसे कमवणं अगदी सोपं आहे. त्यासाठी फक्त वर्दळीच्या ठिकाणी तुमचं घर, दुकान किंवा ऑफिस असणं गरजेचं आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’65ebbfd8-d385-11e8-929f-97da234366d9′]

वकरांगी लिमिटेड या कंपनीने एनसीआर इंडिया या ATM बनवणाऱ्या कंपन्यांना 500 ATM बनवण्याची ऑर्डर दिली आहे. तसंच अन्य वेबसाईट्सवरही ATM बसवण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत. इंडिकॅश, मुथुट आणि इंडिया वन यांसारख्या कंपन्याही व्हाईट लेव्हल एटीएमची सेवा उपलब्ध करुन देतात. व्हाईट लेव्हल ATM ची फ्रन्चायजी घेऊन तुम्ही ATM घेऊ शकता. तुमची कमाई ही दररोज होणाऱ्या ट्रान्जॅक्शनवर अवलंबून असणार आहे. साधारणपणे दररोज जर 50 ट्रान्जॅक्शन झाले तर तुमच्या महिन्याला 19,500 रुपये एवढा इनकम होऊ शकतो. एवढेच नाही तर महिन्याला तब्बल एक लाख 17 हजार रुपयेदेखील तुम्हाला कमवता येतील. यासाठी प्रत्येक दिवशी  300 ट्रान्जॅक्शन तुम्हाला करणे गरजेचे आहे. ATM लावण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा विचार केला तर, ATM लावण्यासाठी तुम्हाला ATM इंस्टॉल करणाऱ्या कंपनीला सुरक्षा डिपॉजिटसाठी 2 ते 3 लाख रुपये द्यावे लागतील.

दुष्काळात महाराष्ट्राला पूर्ण साथ देऊ ; मोदींच्या प्रचाराचा बिगुल शिर्डीतून

ATM लावण्यासाठी तु्म्हाला काही नियमांची पूर्तता करावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे 50 ते 100 स्केअर फुट जागा असणं गरजेचं आहे. इतकेच नाह तर ही जागा ग्राऊंड फ्लोअरला असायला हवी. याशिवाय ATM च्या सुरक्षेसाठीची उपाययोजनासुद्धा तुम्हालाच करावी लागेल. आणखी एक महत्त्वाचं म्हणजे वर्दळीच्या ठिकाणी तुमचं घर, दुकान किंवा ऑफिस असणं गरजेचं आहे. या सर्वअटींची पूर्तता करण्यास तुम्ही जर समर्थ असाल तर तुम्ही तुमच्या घरी, दुकानात किंवा आॅफिसमध्ये ATM लावून घेऊ शकता.

[amazon_link asins=’B071HWTHPH,B01M0JSAFU’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a4687465-d385-11e8-880f-05db823b94a5′]