Money | 1 सप्टेंबरपासून बदलतील रोजच्या जीवनाशी संबंधीत ‘हे’ 8 नियम, सर्वसामान्यांवर होईल थेट परिणाम; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Money | पुढील महिन्यात सप्टेंबरपासून (Changes from 1 September 2021) अनेक मोठे बदल होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर (Money) पडणार आहे. हा बदल EPF पासून चेक क्लियरिंगपर्यंतचे नियम आणि बचत खात्यावरील व्याजापासून LPG नियम, कार ड्रायव्हिंग आणि (Amazon), गुगल (Google), गुगल ड्राइव्ह (Google Drive) सारख्या सेवांवर होणार आहे. जाणून घेवूयात याबाबत सविस्तर :

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

1. PF नियमात होईल बदल
1 सप्टेंबरपूर्वी ईपीएफओ आणि आधार नंबर लिंक (EPFO Link With Aadhaar) केला नाही तर खात्यात कंपनीकडून येणारे योगदान रोखले जाईल. शिवाय तुम्हाला पीएफचे पैसे देखील काढता येणार नाही. यासाठी लवकरात लवकर ईपीएफओ आणि आधार नंबर लिंक करा.

2. बदलत आहे चेक क्लियरिंग सिस्टम
जर तुमच्याकडे बचत बँक खात्यासाठी इंटरनेट बँकिंग (Internet Banking) ची सुविधा नसेल, तर 50,000 रुपयांपेक्षा जास्तच्या मूल्याचा चेक जारी करणे तुमच्यासाठी अडचणीचे ठरू शकते. कारण बँकांनी आता पॉझिटिव्ह पे सिस्टम (PPS) लागू करण्यास सुरू केले आहे. बहुतांश बँका positive pay system 1 सप्टेंबरपासून लागू करतील.

3. PNB च्या सेव्हिंग्ज अकाऊंटवर कमी होणार व्याजदर बँकेशी
पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank- PNB) 1 सप्टेंबर 2021 पासून बचत खात्यात जमावर व्याजदरात कपात करणार आहे.
व्याजदर 3 टक्क्यांनी कमी करून 2.90 टक्के करण्याचा निर्णय घेतला आहे.

4. बदलणार गॅस सिलेंडर मिळण्याची वेळ
1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर किंमतीत बदल होता. तसेच, धारानौला गॅस सर्व्हिसकडून गॅस वितरणाची वेळ बदलली जाईल.
शहरांसह ग्रामीण भागात गॅस वितरणाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

5. बदलणार वाहन इन्शुरन्सचा नियम
आता नवीन वाहन विकल्यास त्यावर पूर्ण इन्श्यूरन्स म्हणजे बंपर टू बंपर इन्श्युरन्स अनिवार्य झाला आहे (हा नियम 1 सप्टेंबरपासून लागू होईल.
प्रत्यक्षात मद्रास हायकोर्टाने आपल्या आदेशात हे म्हटले आहे.
न्यायाल्याने म्हटले की, या पाच वर्षाच्या कालावधीसाठी ड्रायव्हर, पॅसेंजर्स आणि व्हेईकल ओनरला कव्हर करणार्‍या इन्श्युरन्सपेक्षा वेगळा असेल.
बंपर-टू-बंपर इन्श्युरन्समध्ये व्हेईकल फायबर, मेटल आणि रबरच्या पार्टसह 100 टक्केचे कव्हरेज दिले जाईल.

6. OTT प्लॅटफार्मचे सबस्क्रीप्शन महागणार
भारतात ओटीटी प्लॅटफॉर्म डिज्नी प्लस हॉटस्टार (Disney plus hotstar) चे सबस्क्रीप्शन 1 सप्टेंबर 2021 पासून महागणार आहे. यानंतर यूजर्सला बेस प्लानसाठी 399 रुपयांऐवजी 499 रुपये द्यावे लागतील.

7. अमेझॉन लॉजिस्टिक शुल्कात वाढ करणार
डिझेल आणि पेट्रोल महागल्याने अमेझॉन आपल्या लॉजिस्टिक कॉस्टमध्ये वाढ करू शकते.
1 सप्टेंबर 2021 पासून अमेझॉनवरून सामान मागवणे महागणार आहे.
500 ग्रॅमच्या पॅकेटसाठी 58 रुपये द्यावे लागतील. तर, रिजनल कॉस्ट 36.50 रुपये होईल.

8. अशाप्रकारच्या अ‍ॅपवर लागणार प्रतिबंध
गुगलची नवीन पॉलिसी 1 सप्टेंबर 2021 पासून लागू होत आहे. या अंतर्गत फेक कंटेटला प्रमोट करणार्‍या अ‍ॅप्सवर 1 सप्टेंबरपासून प्रतिबंध लावला जाईल. गुगल ड्राइव्ह यूजर्सला 13 सप्टेंबरला नवीन सिक्युरिटी अपडेट मिळेल.

Web Titel : Money these 8 important rules related to common man change from september 1 check full details

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | पुण्यात ‘स्पेशल 26’ ! भा.वि. पोलिसांकडून 9 जणांना अटक, इन्कम टॅक्सचे अधिकारी असल्याची बतावणी करून लुटले 35 लाख (व्हिडीओ)