गणपती बाप्पा पावला ! सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घरसण, जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काल सोन्याच्या भावात एकदम घसरण झाल्यानंतर आज सोनं पुन्हा एकदा स्वस्त झालं आहे. दिल्लीच्या सराफ बाजारात आज सोने 372 रुपयांनी स्वस्त झाल्यामुळे सोन्याचे भाव 38,975 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. तर चांदी देखील आज स्वस्त झाली असून चांदीचे भाव 48,590 प्रति किलो झाले आहे. चांदीचे भाव 1,150 रुपयांनी कमी झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात झालेल्या सोन्याच्या भावातील घसरणीमुळे देशातील सोन्याचे भावात देखील कमी झाले आहेत. सोन्याच्या भावातील ही घसरणं सामान्याला दिलासा देणारी ठरत आहे.आंतरराष्ट्रीय बाजारात न्यूयाॅर्कमध्ये सोने 1,490 डाॅलर्स प्रति औंस आणि चांदी 18.10 डाॅलर्स प्रति औंस असे आहे.

जागतिक स्तरावर सोन्याने सामान्यांना त्रस्त केले असताना काल सोनं 400 रुपयांनी स्वस्त झालं. मागील तीन आठवड्यातील सोन्याच्या भावातील ही सर्वात मोठी घसरण आहे. काल सोन्याचे भाव 400 रुपयांनी कमी झाल्याने सराफ बाजारात सोन्याच्या किंमती 38,970 रुपये प्रति दहा ग्राम झाले होते. चांदीचे भाव देखील 100 रुपयांनी स्वस्त झाले होते त्यामुळे चांदी 48,000 रुपये प्रति किलोग्रामने विकली जात होती. परंतू आज पुन्हा एकदा सोन्याच्या भावात घसरणं होताना दिसली. त्यामुळे लागोपाठ 5 व्या दिवशी सोनं स्वस्त झालं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिका आणि चीनच्या सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा सोन्याच्या किंमतीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सोन्या, चांदीच्या किंमतीत अस्थिर असल्याचे पाहायला मिळत आहे. परंतू लागोपाठ 5 व्या दिवशी सोन्याचे भाव कमी झाले आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like