कर्मचार्‍याच्या बँक खात्यात चुकून जमा झाले ६.६८ लाख ; तो म्हणाला, ‘मोदीजींनी पहिला हप्‍ता पाठवलाय, मी परत करणार नाही’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशातील एका सरकारी कर्मचाऱ्याच्या खात्यावर प्रशासनाच्या चुकीमुळे पैसे जमा झाले. जमा झालेले पैसे परत न केल्याने सरकारी कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच आपल्या खात्यामध्ये पैसे पाठवले आहेत ते परत करणार नाही असे सांगत त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे या कर्मचाऱ्यावर निलंबनाची करावाई करण्यात आली. कर्मचाऱ्याच्या खात्यावर ६ लाख ६८ हजार रुपये जामा करण्यात आले होते.

उत्तर प्रदेशातील हरकोर्ट बटलर टेक्निकल यूनिवर्सिटीत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याच्या खात्यावर पैसे जमा झाले होते. एक वृत्तपत्राच्या माहितीनुसार, कर्मचाऱ्याने खात्यावर जमा झालेले पैसे परत करण्यास नकार दिला असता यूनिवर्सिटीने त्याला निलंबित केले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्राध्यापक डीएल प्रमार यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला १५ दिवसात अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे.

मागील महिन्यापासून हा प्रकार चर्चेचा विषय ठरला आहे. हे पैसे यूनिवर्सिटीचे परिक्षा नियंत्रक आणि सिव्हील इंजिनीअरिंग विभागाचे प्रमुख प्राध्यापक प्रदीप कुमार यांच्या नावे ६ लाख ६८ हजार जमा करायचे होते. मात्र, यूनिवर्सिटीमधील चतुर्थ श्रेणीतमध्ये काम करणाऱ्या प्रदीप कुमार याच्या खात्यावर पैसे जमा झाले. नावामध्ये साम्य असल्याने हा प्रकार घडला. आपली चुक लक्षात आल्यानंतर प्रशासनाने चतुर्थ श्रेणीत काम करणाऱ्या प्रदीप कुमारकडे पैशांची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास नकार दिला.

तसेच त्याने प्रशासनाला लिखीत स्वरूपात पैसे देणार नसल्याचे सांगितेल. प्रदिप कुमारने प्रशासनाला लेखी लिहून देताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच आपल्या खात्यामध्ये पैसे पाठवले आहेत. त्यामुळे मी पैसे परत करणार नाही, असे लिहून दिले. पैसे जमा झाल्यानंतर प्रदीप कुमारने दुसऱ्याच दिवशी बँकेतून ४ लाख ५० हजार रुपये काढून खर्च केले.

प्रशासनाकडून प्रदीप कुमार यांच्यावर पैसे परत करण्यासाठी दबाव टाकण्यात आला. त्यावेळी त्यांनी प्रत्येक महिन्याला दोन-दोन हजार रुपये पगारातून कपात करून घ्यावेत असे प्रशासनाला लेखी सांगितले. प्रशासनाने त्यांचे बँक खाते सील करून रजिस्ट्रार ऑफिसला संलग्न करण्यात आले आहे.

आरोग्यविषय वृत्त –