Monkey B Virus | मनुष्यात ‘मंकी बी व्हायरस’ आल्याने जनावरांच्या डॉक्टराचा मृत्यू; संक्रमित झाल्यास 100 पैकी 70-80 लोकांचा जाऊ शकतो जीव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – चीनच्या बिजिंगमध्ये मंकी बी व्हायरस (Monkey B Virus) ने संक्रमित एका पशुवैद्यकीय डॉक्टरचा मृत्यू झाला आहे. चीनच्या ग्लोबल टाइम्सने हे वृत्त दिले आहे. मंकी बी व्हायरस माकडातून मनुष्यात आला आहे. कोरोना संसर्गादरम्यान मंकी बी व्हायरस (Monkey B Virus) हा नवीन व्हायरस आल्याने आव्हान उभे ठाकले आहे.

ग्लोबल टाइम्सनुसार, सस्तन प्राण्यांवर संशोधन करणार्‍या संस्थेसाठी काम करणार्‍या 53 वर्षांच्या पुरुष पशुवैद्यकीय डॉक्टरने मार्च महिन्यात दोन मृत माकडांची चीरफाड केली होती. याच्या सुमारे एक महिन्यानंतर डॉक्टरमध्ये मळमळ आणि उलटीची लक्षणे सुरूवातीला दिसून आली. याचा खुलासा सीडीसी विकली इंग्लिश प्लॅटफॉर्म ऑफ चायनीज सेंट फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने शनिवारी केला आहे.

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

या पशुवैद्यकीय डॉक्टरने अनेक हॉस्पिटलमध्ये उपचार घेतले. मात्र, 27 मे रोजी त्याचा मृत्यू झाला. तत्पूर्वी चीनमध्ये कोणतीही घातक किंवा वैद्यकीय प्रकारे मंकी बी व्हायरस (Monkey B Virus) ची प्रकरणे समोर आली नव्हती. मंकी बी व्हायरसने पशुवैद्यकीय डॉक्टरच्या मृत्यूचे हे पहिले प्रकरण असल्याचे सांगितले जात आहे. संशोधकांनी एप्रिल महिन्यात पशुवैद्यकीय आणि त्याच्या कुटुंबियांच्या नमून्याची चाचणी केली. डॉक्टरमध्ये मंकी बी व्हायरसचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मात्र, कुटुंबियांच्या चाचणीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले.

मंकी बी व्हायरस (Monkey B Virus) च्या थेट संपर्कात आणि शारीरीक स्त्रावाच्या संपर्कात आल्याने हा पसरतो.
याचा मृत्युदर 70 ते 80 टक्केपर्यंत सांगितला जात आहे.
चीनने विशिष्ट विषाणू मुक्त माकडांमध्ये व्हायरस नष्ट करणे आणि चीनची प्रयोगशाळा मॅकाक आणि व्यसावसायिक कामगारांवर कठोर देखरेख ठेवणे आवश्यक आहे.

कोरोना व्हायरससुद्धा चीनच्या वुहानमधून जगभरात पसरला होता.
अशावेळी चीनमधून आणखी एक व्हायरस पसरण्याचा धोका सर्वांना वाटत आहे.
कोरोना व्हायरसच्या संभाव्या तिसर्‍या लाटेदरम्यान आणखी एक भयंकर मंकी बी व्हायरस समोर आल्यानंतर यास तोंड देणे आव्हानात्मक ठरू शकते.

Web Titel :- Monkey B Virus | veterinarian dies due to monkey b virus in humans 70 to 80 people out of 100 can die if infected

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

शिवसेनेचे माजी खा. आढळराव पाटलांनी काढली खासदार अमोल कोल्हेंची ‘उंची’, म्हणाले – ‘कोल्ह्याने उंटाच्या पार्श्वभागाचा…’ (व्हिडीओ)

DGP Sanjay Pandey | काय सांगता ! होय, चक्क पोलीस महासंचालकांनी Facebook वरुन दिला Work Report

Linking Vaccine certificate to Passport | व्हॅक्सीन सर्टिफिकेट पासपोर्टशी ‘या’ पध्दतीनं लिंक करा; जाणून घ्या प्रक्रिया अन् महत्वाच्या प्रश्नांची उत्तरे

Pune Crime | परमीटरुममध्ये जाऊन हप्ता मागणार्‍या तोतया महिला पत्रकारासह दोघांना अटक