अचानकपणे आभाळातून नोटांचा पाऊस सुरू, माकडानं उडवली धमाल

बदायूं (उत्तर प्रदेश) : वृत्तसंस्था – उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली आहे. एका वकिलाची नोटांची भरलेली बॅग माकडाने झाडावर पळवून नेली आणि नोटांचा वर्षाव केला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
वकील सोबरन सिंह आपल्या बॅगेत 65 हजार रुपये भरण्यासाठी कोषागारात जात होते, तेव्हा एक माकड आले आणि त्यांच्या हातातून नोटांची बॅग हिसकावून कचेरी जवळच्या झाडावर नेली. झाडावर असलेल्या दोन माकडांनी त्याच्या हातातील बॅग हिसकावून घेत नोटा हवेत फेकून देण्यास सुरुवात केली.
आकाशातून नोटांचा पाऊस सुरू झाला तेव्हा अनेक लोक तेथे जमा झाले. काही नोटा लोकांनी जमा केल्या तर काही नोटा माकडांनी फाडल्या. लोकांनी जमा केलेल्या नोटा मालकाला परत केल्या. माकडांनी जवळपास 8 हजार रुपयांच्या नोटा फाडून टाकल्या. वकिलाला केवळ 57 हजार रुपये परत मिळाले. ही घटना मंगळवारची असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
visit : Policenama.com
- तारुण्य टिकविण्यासाठी तरूणांनी ‘हे’ खावे, व्यक्तीमहत्व खुलण्यासाठी आवश्य
- दम्याचा त्रास असेल तर घरातील ‘हा’ पदार्थ आहे रामबाण उपाय, जाणून घ्या
- मुलींमध्ये अठराव्या वर्षानंतर उद्भवू शकतात ‘या’ समस्या, करा ‘हे’ उपाय
- पुरूषांनो, डोक्याला टक्कल पडली असेल तर करा ‘हे’ खास घरगुती उपाय
- महिलांनी ‘हे’ फळ खाल्ले तर येणार नाही ‘हार्टअटॅक’, हे आहेत आरोग्यदायी फायदे
- तुम्हाला ‘ही’ सवय असेल तर वेळीच व्हा सावध, हाडे होऊ शकतात ठिसूळ
- परीक्षेचे टेन्शन घेऊ नका, तणावमुक्त राहण्यासाठी अशी करा तयारी
- आरोग्यासह सौंदर्य प्रदान करणारे आहे ‘हे’ पारंपारिक पेय, नियमित प्या