चिंताजनक ! ‘कोरोना’सोबतच आता राज्यात माकड’ताप’, 2 जणांचा मृत्यू

सिंधुदुर्ग : पोलीसनामा ऑनलाईन – महाराष्ट्र मध्ये कोरोना रुग्णांची संख्या ४२ झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णांची वाढती संख्या पाहून सर्वांनी त्याचा धसका घेतला आहे. त्यातच आता अजून एक संकट महाराष्ट्रावर घोंघावतय, ते म्हणजे माकडतापाचं (Monkey Fever).

या माकडतापाने सिंधुदुर्गात आतापर्यंत दोन जणांचा बळी घेतला असून, ३ महिन्यांत याचे १८ रुग्ण आढळले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डेगवे आणि पडावे गावात माकडतापामुळे प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. या दोघांवरती गोवा बांबुळी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान एकाचा चार दिवसांपूर्वी तर एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोना सोबत आता माकडतापा बाबतीत लोकांमध्ये भीती निर्माण झाली आहे. या आजाराने दोघांचा बळी घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातील ८ गावांमध्ये सतर्कता जारी करण्यात आली आहे.

माकडतापाची लक्षणे

अंगदुखी, ताप, सांधेदुखी, अशक्तपणा, ताप गेला तरी सांधेदुखी कायम राहते, अशी लक्षणे माकडतापात आढळतात.