माकडाला कळलं तुम्हाला कधी कळणार ? (व्हिडिओ)

पुणे : पोलिसनामा ऑनलाईन – अनेकदा आपण दुष्काळात पाण्यासाठी वणवण भटकत असतो. उन्हाळ्यात पाण्याच्या या दुर्भिक्ष्यामुळे अनेक प्राण्यांना आणि नागरिकांना आपला जीव देखील गमवावा लागतो. त्यामुळे पाणी वाचवण्याचा संदेश आपण काय नागरिकांना देत असतो. काहीवेळा माणसांना तो संदेश काळात नाही मात्र प्राण्यांना तो लवकर कळतो. किंबहुना त्यांना त्याची किंमत जास्त जाणवत असते.

याचसंबंधीचा रंजक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या 14 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये एक माकड आपल्याला पाणी वाचवण्याचा संदेश देत असल्याचे दिसून येत आहे. या व्हिडिओत हे माकड वाया जात असतानाचे पाणी वाचवताना दिसून येत आहे. निहारिका सिंग पांजले यांनी आपल्या ट्विटरवरून हा व्हिडीओ व्हायरल केला असून यामध्ये त्यांनी शानदार कॅप्शनमधील देखील दिले आहे.

जंगलात राहणाऱ्या प्राण्यांना जर एवढी बुद्धीमत्ता, संवेदनशीलता असेल तर मग मला असा प्रश्न पडतो की, मानव असं का वागतो? आणि खरे प्राणी कोण आहेत? असे कॅप्शन देखील या व्हिडीओ खाली देण्यात आले आहे. त्यामुळे माणूस असा विचार करू शकत नाही का ? असा प्रश्न देखील सोशल मिडीयावर नागरिक विचारात आहेत. दरम्यान, या व्हिडिओला सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून या प्राण्यांप्रमाणे अपम देखील वागण्याचा सल्ला अनेक नागरिक देताना दिसून येत आहेत.

Visit : Policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like