Mansoon केरळात झाला दाखल !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – Mansoon – मागील काही दिवसांपासून महाराष्ट्राला सातत्याने अवकाळी (Mansoon ) पावसाचा तडाखा बसत आहे. तसेच आजही राज्यात पूर्व मोसमी पावसाचं सावट दिसत आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, रत्नागिरी, जालना, औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि विदर्भात आज दुपारपासूनचं तुरळक ठिकाणी ढगाळ वातावरणाची नोंद झाली आहे. परिणामी याठिकाणी पुढील तीन तासांत मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

हवाई सुंदरीकडून अब्जाधीशांची ‘पोलखोल’ ! खासगी विमान प्रवासादरम्यानचं ‘गुढ’ सांगितलं, म्हणाली – ‘लाखोंचा पगार,पण नको ते…’

 

दरम्यान, केरळात मान्सून (Mansoon) चे आगमन झाले आहे. गोवा आणि तळकोकणात पुढील काही दिवसांत त्याचे आगमन होणार आहे.
२१ मे रोजी अंदमान बेटांवर मान्सून (Mansoon) दाखल झाला होता.
त्यानंतर बंगालच्या उपसागरात ‘यास’ चक्रीवादळ तयार झाले.
त्यामुळे मान्सूनला वाट मिळाल्याने गुरुवारी मान्सून (Mansoon) ने श्रीलंकेसह मालदीव आणि कोमोरीन समुद्राच्या काही भागांत वाटचाल केली.

‘गोल्डमॅन’ दत्ता फुगे यांच्या खून प्रकरणातील आरोपींसह तिघांकडून पिस्तूल आणि काडतुसे जप्त

 

हवामान विभागाच्या सुधारित अंदाजानुसार, मान्सून (Mansoon) हंगामात (जून ते सप्टेंबर) सर्वसाधारण म्हणजेच १०१ टक्के पाऊस पडण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रासह मध्य भारतात १०६ टक्के पावसाची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना चांगलाच दिलासा मिळणार आहे. दरम्यान, काल मुंबईसह ठाणे परिसरात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस पडला आहे. त्यामुळे नागरिकांची पुरती धांदल उडाली होती. दरम्यान, मुंबई आणि ठाणे परिसरातही अवकाळी पावसाचे ढग दाटले आहे. याठिकाणी आज पाऊस कोसळणार की नाही? याची स्पष्टता काही तासांतचं येईल. घराबाहेर पडताना खबरदारी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

पतांजलिच्या ‘कोरोनिल’वरुन न्यायालयाने बजावले समन्स; बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ

रिकाम्या पोटी कधीही ‘या’ गोष्टी करू नका, होऊ शकते नुकसान; जाणून घ्या कसे

नेमकी काय आहे FELUDA टेस्ट ! जी मिनीटांमध्ये देते कोरोना रिपोर्ट, RT-PCR पेक्षा देखील चांगली? जाणून घ्या

कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी इलायचीसह (वेलदोडा) मधाचं सेवन करा, जाणून घ्या इतर देखील फायदे